मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद ! 10 मोटारसायकल हस्तगत..

Khozmaster
5 Min Read
प्रविण चव्हाण
 
नंदुरबार -: मोटर सायकलची चोरी करणारी  टोळी जेरबंद करण्यात नंदुरबार शहर  पोलीस ठाणेला यश आले.
    असून 03 लाख 75 हजार रुपये किंमतीच्या 10 मोटारसायकल हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलिसांना यश आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी दिली आहे.
  मोटार सायकल चोरटय़ाकडून 10 चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या  पथकाला यश आले आहे.
    सद्दाम शेख अजीज मिस्तरी ( 31)  रा.नंदुरबार ता. जि. नंदुरबार.
     शहारुख शेख अजीज,
(28 ) रा. नंदुरबार ता. जि. नंदुरबार.
   असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी,
  तक्रारदार नामे  संजय मोहनलाल जैन, (45) व्यवसाय मेडीकल स्टोअर्स, रा. काका हाऊस, परेदशीपुरा, नंदुरबार यांचे मालकीची 30,000/- रु. किं.चो एक TVS कंपनीची ज्युपीटर स्कुटर तिचा क्रमांक MH1-39-Q-5908 असा असलेली ही 26 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 09.00 ते दुपारी 04.00 वा. च्या दरम्यान नंदुरबार शहरातील अंधारे चौक येथील ओम डायग्नोस्टीक अॅन्ड मेडीकल समोर रोडवर लावलेली असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली म्हणून त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द गुरनं. 839/2023 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता..
    नंदुरबार जिल्हा पोलीस अधिक्षक  पी. आर. पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणणे बाबत नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक  निवृत्ती पवार यांना आदेश दिला.
 नंदुरबार शहर, पोलीस निरीक्षक  निवृत्ती पवार यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथून चोरीस गेलेल्या मोटार सायकल बाबत गुन्हे शोध पथकाशी चर्चा केली. तसेच चोरीस गेलेल्या मोटारसायकलच्या शोधासाठी 03 पथके तयार केली.
 पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील यांना मोटार सायकलची चोरी करणारा एक इसम हा नवापूर चौफुली परीसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली.
    पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील यांनी पोनि निवृत्ती पवार यांना बातमीची खात्री करून कारवाई करणे बाबत आदेशीत केले त्याअनुषंगाने पोनि / निवृत्ती पवार यांनी वर नमुद पोलीस पथकासह नवापूर चौफुली परिसरात सापळा रचला असता संशयीत आरोपी हे एका मोटार सायकल सह येत असतांना दिसुन आले.
   पोलीस पथकाने त्यांना थांबविण्याचा इशारा केला असता परंतु संशयीत आरोपी हे मोटारसायकलसह पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागले.
  त्यानंतर पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले, त्याचे कडे ताब्यात असलेल्या मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता ते उडवा उडवीची उत्तरे देवू लागले.
   त्यानंतर त्यांना नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे आणुन विश्वासात घेवून विचारपुस करता त्यांनी त्याचे नावे सद्दाम शेख अजीज मिस्तरी (31) रा. चिराग गल्ली, नंदुरबार ह.मु. सिव्हील हॉस्पीटल जवळील घरकुल, नंदुरबार ता. जि. नंदुरबार असे असल्याचे सांगुन त्याचे सोबत आणखी एक इसम  शहारुख शेख अजीज, (28)  रा. चिराग गल्ली नंदुरबार ता. जि. नंदुरबार असा असल्याचे सांगुन त्यांनी दोघांनी नंदुरबार शहर येथून मोटारसायकल चोरी केल्याची माहिती दिली.
   त्यांचेकडे 30,000/- रु. किं.ची एक TVS कंपनीची ज्युपीटर स्कुटर तिचा क्रमांक MH-39-Q-5908 असा असलेली ही मिळाली असून त्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.न. 839 / 2023 भादवि कलम 379 प्रमाणे दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
    सदरची मोटारसायकल ही कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केली. तसेच त्यांचेकडे अधिक विचारपुस करता त्यांनी आणखीन 09 मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिली. सदरच्या मोटारसायकली देखील कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केल्या. आरोपी नामे सद्दाम शेख अजीज मिस्तरी याने भारतीय पुरावा कायदा कलम 27 प्रमाणे सिव्हील हास्पीटल जवळील घरकूल वसाहत येथून काढून दिल्याने जप्त करण्यात आल्या.
     अशा प्रकारे नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील तसेच विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या वरील वर्णनाच्या व 3,75,000/- रुपये किंमतीच्या एकुण 10 मोटारसायकली हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथकाला यश प्राप्त झाले आहे.
  तसेच अटक करण्यात आलेले आरोपी यांचे अभिलेख तपासले असता आरोपी नामे
   सद्दाम शेख अजीज मिस्तरी ( 31) रा. चिराग गल्ली, नंदुरबार ह.मु. सिव्हील हॉस्पीटल जवळील
घरकुल, नंदुरबार ता. जि. नंदुरबार असे असल्याचे सांगुन त्याचे सोबत आणखी एक इसम  शहारुख शेख अजीज,
(28 ) रा. चिराग गल्ली नंदुरबार ता. जि. नंदुरबार याचे विरुध्द यापुर्वी उपनगर पोलीस ठाणे येथे 01 गुन्हा दाखल आहे.
    सदर कारवाईत आणखीन आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नसुन नंदुरबार जिल्हयातून चोरी गेलेल्या इतर मोटारसायकली तसेच मोबाईल हस्तगत होवु शकतात असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सांगीतले आहे तसेच त्याबाबत अधिक तपास सुरु आहे.
  ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधिक्षक  पी. आर. पाटील  अपर पोलीस अधिक्षक  निलेश तांबे  नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी  संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस  पोलीस निरीक्षक  निवृत्ती पवार, पोसई विकास गुंजाळ,  जगदिश पवार,  राजेश येलवे,  दिपक गोरे,  भटु धनगर,  बलविंद्र ईशी पोना/स्वप्निल पगारे,  किरण मोरे,  भालचंद्र जगताप, राहुल पांढारकर, अनिल बड़े,  इम्रान खाटीक,  कल्पेश रामटेके,  युवराज राठोड, विशाल मराठे, प्रविण वसावे,  हरीष कोळी, निंबा वाघमोडे यांच्या पथकाने केली आहे.

0 9 4 9 9 4
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *