सावधान! मुले पळविणारी टोळी क्रियाशील

Khozmaster
2 Min Read
 अलिबाग (दि. ३) श्रीबाग येथील कै. भाऊ जगे गार्डनमध्ये मुलांना पकडून पोत्यात भरीत असताना एका मुलाने पकडणार्याच्या हाताला चावा घेऊन ते मूल रडत सैरावैरा पळू लागले . सर्वत्र गोंगाट झाला. पोलिसांना दूरध्वनीमार्फत कळविले. प्रतिसाद नाही. शेवटी पालक पोलिस ठाण्यात गेले. तरीही दाद घेतली नसल्याचे पालक जयेश रसाळ यांनी सांगितले .
    अलिबाग येथील अ. ता. . शि. प्र. मंडळाच्या शिशुविहार प्राथमिक शाळेतील विद्यार्थी म़ंथन जयेश रसाळ सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पालकासमवेत तो घरी जात असताना वाटेत जगे गार्डनमध्ये खेळू लागला. पालक जयेश रसळ चहा पिण्यासाठी बाहेर गेले.
इतक्यात दोन इसम दोन मुलांना पोत्यात भरू लागले . पैकी एका मुलाने आरडाओरड करून पकडणार्या इसमाच्या हाताला चावा घेतला. आणि पळ काढला. नःतर गोंगाट झाला. मंथनचे पालक जयेश रसाळ आले. मंथनला धीर दिला. काळोख पडण्याची वेळ होती . पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पण प्रतिसाद न मिळाल्यामुळे मंथनसह पोलिस ठाणे गाठले. पण तेथेही दाद लागली नाही असे पालक जयेश रसाळ यांनी सांगितले .
  ही गःभीर बाब शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वेखँडे यांनी संस्थेला कळविली . त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष बळवँत वालेकर व सेक्रेटरी द. ल. माळवी शाळेत जाऊन सर्व परिस्थिती समजावून घेतली. विद्यार्थी मंथन व पालक यांच्याशी संपर्क साधला. आणि दोनही पदाधिकारी अलिबाग पोलिस ठाण्यात गेले. ठाणे अँमलदाराची भेट घेऊन या गंभीर बाबीची तक्रार नोदविली.
    पण पालकाःनो , सावधान ! मुले चोरणारी टोळी क्रियाशील झाली आहे.
0 9 4 9 9 4
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *