राजा राम मोहन रॉय प्रतिष्ठानकडून ग्रंथालयांना अर्थसहाय्य 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Khozmaster
10 Min Read

बुलढाणा दि. 3 (जिमाका):- राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्याकडून शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालयामार्फत राबविण्यात येते. त्यानुसार यावर्षीसाठी ग्रंथालयांनी दि. 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2023-24 वर्षासाठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भांतील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन  घ्यावा.

 समान निधी योजनांमध्ये इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना (रु. 25 लक्ष रुपये), वरील योजनेच्या व्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत.

असमान निधी योजनेत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तारासाठी अर्थसहाय्य(फर्निचर खरेदी 4 लक्ष रुपये व इमारत बांधकाम 10 ते 15 लक्ष रुपये). राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ‘ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य (2 लक्ष 50 हजार रुपये) व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण (2 लक्ष). महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य(6 लक्ष 20 हजार व इमारत विस्तारासाठी 10 लक्ष). राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य( 1 ते 3 लक्ष रुपये), बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय ‘बाल कोपरा स्थापन’ करण्याकरीता अर्थसहाय्य (6 लक्ष 80 हजार) देण्यात येते.

योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी www.rrlf.gov.in या संकेतस्थळावरून माहिती घ्यावी. आवश्यकता असल्यास जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन  ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांनी केले आहे.

000000

विश्वकर्मा योजनेत ‘मास्टर ट्रेनर’ची आवश्यकता;

इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन

बुलढाणा दि. 3 (जिमाका):-हस्तकारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना राबविण्यात येते. त्यात विविध 18 ट्रेडचे प्रशिक्षण युवकांना दिले जाते. प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनरची आवश्यकता असून इच्छूकांनी अर्ज करावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार सहायक आयुक्त प्रवीण खंडारे यांनी केले आहे.

योजनेत मिस्त्री, गवंडी, टेलर, सुतार, आर्मरर, बोट मेकर, बार्बर (न्हावी), ब्लॅकस्मिथ (लोहार), कॉबलर (चर्मकार), पॉटर (कुंभार), वाशरमन, सोनार, हॅमर अँड टुलकिट मेकर, मालाकार, टोपली, चटई तयार करणारा, डॉल अँड टॉय मेकर, फिशिंग नेट मेकर, शिल्पकार, लॉक स्मिथ (कुलुप तयार करणे व दुरुस्ती) आदी 18 ट्रेडचे प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनरची आवश्यकता आहे.  संबधितत ट्रेडमधील माहिती असलेल्या किमान 20 वर्षे अनुभव असलेल्या इच्छूक व्यक्तींनी नोंदणीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा येथे किंवा 07262-242342 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना;

अपघातात अपंगत्व आल्यास अर्थसाह्य

बुलढाणा दि. 3 (जिमाका): गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सुधारणा करून  दि. 19 एप्रिल 2023 नुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते. त्यानुसार अपघातात शेतकऱ्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास शेतकरी किंवा वारसदारांना आर्थिक मदत दिल्या जाते.  शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

योजनेत 10 ते 75 वयोगटातील अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता वहितीधारक शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकर्‍याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतक-याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणीही एक व्यक्ति) अशा एकूण दोघांसाठी योजना राबविण्यात येत आहे.

अपघातग्रस्ताना 2 लाखाची मदत

योजनेत अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख, अपघातामुळे दोन डोळे, दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास 2 लाख, अपघातामुळे एक डोळा आणि एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 2 लाख, तसेच अपघाताने एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख आर्थिक सहाय्य देण्यात येते.

            योजनेत  रस्ता अपघात,रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलाईटकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या हल्ल्यात/चावण्यामुळे जखमी,मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू , दंगल, अन्य कोणताही अपघात या अपघातांचा समावेश आहे.

             त्याचप्रमाणे, योजनेत नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध,.सैन्यातील नोकरी,  जवळच्या लाभधारकाकडून खून याबाबींचा समावेश असणार नाही.

            आवश्यक कागदपत्रे : सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं.6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, वारसदाराचे ओळखपत्र आधारकार्ड, पॅनकार्ड, बॅक पासबुक, निवडणुक ओळखपत्र, अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला, प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, अपघाताच्या स्वरुपनुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे.

जिल्ह्यातील अपघातग्रस्त शेतकरी,  शेतक-यांचे वारसदार यांनी दि. 19 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात घटना घडलेली असेल तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याकडे 30 दिवसाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोज ढगे यांनी केले आहे.

 00000

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

 

 

बुलढाणा दि. 3 (जिमाका): नोव्हेंबर महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील असे पाठवावे, असे तहसिलदार यांनी कळविले आहे.

000000

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत

विहीर व फळबाग लागवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

बुलढाणा दि. 3 (जिमाका):  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विहिरी व शेततळयांची कामे करण्यात येणार आहे. तसेच शेतीपुरक पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी वृक्ष व फळबागाची लागवड करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

महाराष्ट्र गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत मिशन मोडवर विहिरी व शेततळयांची कामे सुरु करण्याचे निर्देश मनरेगाचे महासंचालक यांनी दिले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत येथे 15 विहिरी व 10 शेततळयांची कामे करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत येथे 1000 बांबू रोपे लागवड, 500 शेवगा रोपे लागवड, 2 हेक्टर क्षेत्रावर सार्वजनिक वृक्ष व फळबाग लागवड करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना आपल्या शेतात विहीर अथवा फळबाग लागवड करावयाची आहे त्यांनी MAHAEGS Horticulture किंवा Well App वर आपली नोंदणी करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात अथवा बांधावर बांबू लागवड, शेवगां लागवड करावयाची आहे त्यांनी ग्रामपंचायत, तालुका कृषि अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग यांच्याकडे आपली मागणी सादर करावी, अशी माहिती मनरेगाचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांच्या दुरदृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात होणार अमुलाग्र बदल

स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांचे प्रतिपादन

बुलढाणा दि. 3 (जिमाका): ग्रामीण, शहर, उदयॊग व शेती यांना कायमस्वरूपी व अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व सुधारीत वितरण क्षेत्र योजना (RDSS) या सारख्या महत्वाकांक्षी योजना आणल्या आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत शेतीसाठी दिवसा वीज मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल होणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कपंनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी दिले.

बुलडाणा जिल्हाअंतर्गत विद्युत क्षेत्रातील विषयांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन सभागृहात आज आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार संजय रायमुलकर, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. अरविंद भादीकर, प्रादेशिक संचालक श्री. सुहास रंगारी उपस्थित होते.

विश्वास पाठक म्हणाले की, ऊर्जामंत्री यांच्या दुरदृष्टीने राज्यात सुधारीत वितरण क्षेत्र योजना (RDSS) मध्ये ४२ हजार कोटींची यंत्रणा बळकटीकरणाची कामे होत आहेत, त्यापैकी जिल्ह्यात सुमारे १ हजार ५०० कोटी रूपयांचे काम सुरू झाले आहे. यामुळे वितरण हानी कमी होऊन जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीज सेवा मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या महावितरण,महापारेषणच्या विविध योजनांचे योग्य नियोजन व अंमलबजावणी करावी.

जिल्ह्यातील वीज सेवा ग्राहकांना अनुरूप ठेवण्यावर भर देण्यात यावा, त्यासाठी जिल्ह्यातील वीज ग्राहक आणि लोकप्रतिनिधींच्या ऊर्जा क्षेत्राबद्दल असलेल्या सूचना, समस्या व तक्रारांची गांभीर्याने दखल घेऊन त्या प्राधान्याने सोडविण्यात याव्यात. विद्युत अपघातामुळे अनेक वेळा प्राण गमवावे लागतात ही दुर्दैवाची बाब असून विद्युत अपघात शून्य होण्यासाठी विद्युत निरीक्षक विभागांनी शाळा तथा ग्राहकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम राबवावेत, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

संचालक(मानव संसाधन) अरविंद भादीकर यांनी नादुरूस्त झालेल्या रोहित्राची तत्काळ माहिती मिळावी यासाठी रिपोर्टींग मेकॅनिझम तयार करण्यास सांगीतले. याशिवाय कृती मानकांनुसार नादुरूस्त रोहित्र बदलून देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. वितरण हानी कमी करण्यासाठी विभागानुसार नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सुचना  यावेळी त्यांनी केल्या. येणाऱ्या काळात स्मार्ट मिटरमुळे ग्राहकांना होणारे फायदे आणि सुविंधाबाबत माहिती देण्यात यावी, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील महावितरणचा महसूल, वसुली, थकबाकी, वीज गळती, त्यावरील उपाययोजना, पायाभूत सुविधा, वीज पुरवठा यंत्रणेची सद्यस्थिती आणि प्रस्तावित नियोजन यासंदर्भात मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी, तर महापारेषणच्या संदर्भात मुख्य अभियंता जयंत विके, महाऊर्जा विभागाशी संबंधीत प्रफुल्ल तायडे यांनी सविस्तर सादरीकरण बैठकीमध्ये केले. या बैठकीला महावितरण, महापारेषण, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग या विद्युत क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

0 9 4 9 9 4
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *