सिद्धांत वेलफेअर फाउंडेशन ने केली विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप

Khozmaster
1 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,०२
येथील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सिद्धांत वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने बुधवार(ता,०१)रोजी
संत रोहिदास मागास मुलांचे वसतिगृह व मदर तेरेसा मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहातील गोर,गरीब मागासवर्गीय मुलां-मुलींची मोफत आरोग्य तपासणी करून गरजू विद्यार्थ्यांना मोफत औषधी ही वाटप करण्यात आली,अध्यक्षस्थानी आ,रमेश, पा, बोरनारे  यांचे बंधू  संजय बोरनारे होते तर प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत होते,,शिवसेना शहर प्रमुख पारस घाटे ,नगर सेविका माधुरी दशरथ बनकर,जयश्री दिनेश राजपूत व श्री, नाईकवाडी यांची उपस्थिती होती,आरंभी या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ,संतोष गंगवाल,यांनी प्रास्ताविक केले, डॉ,गंगवाल व डॉ,जैन यांनी विद्यार्थ्यांचे वजन करून आरोग्य तपासणी केली व गरजू विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते मोफत औषधी
वाटप करण्यात आली,या प्रसंगी १०० विद्यार्थ्यांची तपासणी झाली,सूत्र संचलन या वस्तीगृहाचे अण्णासाहेब ठेंगडे  यांनी केले, सौ,ठेंगडे यांनी आभार मानले,या प्रसंगी सौ,गंगवाल यांची उपस्थिती होती,
(फोटो कॅपशन-औषधी वाटप करतांना धोंडीराम राजपूत,संजय बोरनारे, डॉ,संतोष गंगवाल,पारस घाटे)
0 9 4 9 9 4
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *