सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव; मराठा आरक्षणासाठी आमरण काल मागे घेण्यात आले आहे.उपोषणाला बसलेल्या अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्यातून आंदोलन केले जात आहे. मराठा समाजाच्या तीव्र भावना ह्या आंदोलनाच्या माध्यमातून दिसून येऊ लागलेल्या आहेत. परंतु सरकार मात्र मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही भूमिका घ्यायला तयार नाही. नुसती बघ्याची भूमिका पार पाडत असून हे सरकार मूग गिळून बसलेले आहे. आजही अनेक मराठा तरुण आत्महत्या करत आहेत. तरीही ह्या सरकारला पाझर फुटेना.मराठा आरक्षण प्रश्नी सरकारला पाझर फुटणार आहे की नाही? असा सवाल सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील प्रा जीवन कोलते पाटील यांनी सकल मराठा समाज सोयगाव तालुक्याच्या वतीने साखळी उपोषणा प्रसंगी उपस्थित केला. सावळदबारा,मोलखेडा व डाभा नोव्हेंबर रोजी उपोषण व कॅन्डल मार्च आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा जीवन कोलते पाटील, जेष्ठ नागरिक रामभाऊ वारंगणे यांच्याकडून सुद्धा करण्यात आलेले आहे.प्रा जीवन कोलते पाटील म्हणाले की, आरक्षण आम्हाला मिळायला हवे. आरक्षण घेणे हा सुद्धा आमचा अधिकार आहे. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर हे आरक्षण देण्यात यावे. एका दिवसात पक्ष फुटतोय, पहाटेचा शपथविधी घडतोय तर इथल्या सरकारला एका दिवसात का आरक्षण मिळवून देता येत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आज आरक्षण नसल्याने शिक्षण घेणे अवघड झाले आहे. नोकऱ्या मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मराठा समाजातील मुलांची कुचंबना होउ लागलेली आहे. गुणवत्ता आणि टक्केवारी आहे.परंतु आरक्षण नसल्याने विद्यार्थी सोई सुविधांपासून वंचित राहत आहेत. मोर्चे काढून राज्यभर आरक्षणाचे वादळ निर्माण करण्यात आले.
आरक्षण मिळवून देण्यासाठी धडपड सुद्धा झाली. आरक्षण मिळण्याची घोषणा झाली.परंतु न्यायालयाच्या कसोटीवर हे आरक्षण टिकले नाही. आज ही आरक्षणाचा मुद्दा न सुटल्याने अखेर मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.मराठा समाजाचे अजून किती बळी घेणार आहात. असा सवाल सुद्धा प्रा जीवन कोलते पाटील व जेष्ठ समाजसेवक रामभाऊ वारंगणे यांनी उपस्थित केला. आमरण उपोषण, साखळी उपोषण, लाक्षणिक उपोषण आजही सुरू आहे.त्यामुळे आता तरी या आंदोलनाकडे राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मराठा समाजाला आता आरक्षण मिळालेच पाहिजे अशी तीव्र भावना मराठा समाजात असून या भावनेची कदर राज्यकर्त्यांनी करावी असे प्रा जीवन कोलते पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी म्हटले आहे.
Users Today : 25