खळबळजनक! पतीने पोलीस पत्नी अन् मुलीला संपवलं, नंतर केलं धक्कादायक कृत्य

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे खामगाव रोडवर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ ऐका घरात थोड्या वेळापूर्वी खुनी थरार घडला. महिला पोलिस कर्मचारी वर्षा दंदाले हिची तिच्या पतीने चाकूने हत्या केली. कांदा कापायच्या चाकूने या माणसाने दीड वर्षाच्या मुलीचाही खून केला. दोघांचा जीव घेतल्यानंतर हा व्यक्ती घटनास्थळावरून निघून सरळ अंढेरा जवळ आला आणि या परिसरात त्याने झाडाला फाशी लावून आत्महत्या केली.मिळालेल्या माहितीनुसार पोलीस सध्या घटनास्थळावर असून महिला आणि चिमुरडी मुलीचे प्रेत ताब्यात घेण्यात आले आहे. ज्याने आपल्या पत्नीचे आणि मुलीचे हत्या केली तो व्यक्ती कुठल्याही नोकरीवर नव्हता. अद्याप त्याचे नाव कळू शकलेले नाही. घटनास्थळावर रक्ताच्या थरावरत आई आणि मुलगी दोघांचे फोटो चित्र विचलित करू शकतात अशा परिस्थितीमध्ये घटनास्थळावर परिस्थिती आहे.नेमका कोणत्या कारणाने आणि का भर दुपारी ही घटना घडली. या मागचं नेमकं कारण काय याकडे आता पोलिसांनी आपली तपास यंत्रणा व त्याची दिशा घेण्याचे काम सुरू केले आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

0 9 4 9 8 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *