नवजात बाळाला बेवारस सोडून निर्दयी आई पसार, शेगाव मंदिर परिसरातील घटना समोर

Khozmaster
2 Min Read

बुलडाणा : सलगच्या सुट्ट्या आणि अधिक मासमुळे सध्या संतनगरी शेगाव भक्तांनी गजबजून गेली आहे. लाखोच्या संख्येने संतनगरीमध्ये भाविक दर्शनासाठी येत आहेत. पण याच संतनगरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.एक निर्दयी आई आपल्या नवजात बाळाला तिथेच सोडून पसार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर महिलेचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. आपल्या बाळाला घेऊन ती मंदिरात येत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. पण पुढे नावजात बाळाला तिने मंदिरातील चप्पल स्टॅन्ड परिसरातच सोडून दिल्याचं लक्षात आलं.पोटच्या नवजात बाळाला ऐका आईने टाकून दिल्याची घटना शेगाव येथे घडली. शेगाव शहरात श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात नवजात मूल बेवारस दिसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहिती नुसार श्री संत गजानन महाराज मंदिर येथे गोपाळ सहदेव काळे (वय ३२) हे सेवाधारी म्हणून काम करतात. हे १२ ऑगस्टला संध्याकाळी ७ वाजता मंदिरात चप्पल स्टैंड परिसरात ड्युटीवर हजर असताना एक अनोळखी २५ ते ३० वयोगटातील हिरवी साडी ब्लाऊज परिधान केलेल्या महिला आली. तिच्याजवळील मुलाचा सांभाळ न करता ती त्याला मंदिराच्या परिसरात बेवारस अवस्थेत सोडून निघून गेली. त्या महिलेवर कारवाई व्हावी, यासाठी फिर्यादी गोपाल काळे यांचे शेगांव शहर पोलीस स्टेशन येथे तोंडी रिपोर्ट वरून ४३८/२३ कलम ३१७ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय गजानन गावंडे करीत आहेत.

0 9 4 9 8 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *