देवदर्शनावरून परतताना २ खासगी ट्रॅव्हल्सना भीषण अपघात; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू, ३० जखमी

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात दोन खासगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २५ ते ३० जण जखमी असल्याची माहिती आहे. अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा अपघात मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहावर आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास झाला.अपघाताबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अमरनाथ तीर्थयात्रा करून एम. एच. ०८, ९४५८ ही खासगी बस हिंगोलीच्या दिशेने जात होती. या बसमध्ये जवळपास ४० भाविक होते. तर दुसरीकडे एम. एच. २७ बी. एक्स. ४४६६ ही बस नागपूरवरून नाशिकच्या दिशेने जात होती. मात्र मलकापूर शहरातील लक्ष्मी नगर उड्डाणपुलावर येताच या दोन्ही बसेसची समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात गंभीर जखमी जालेल्या सहा प्रवाशांनी जागीच प्राण सोडले. तर अन्य जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, या भीषण अपघातात दोन्ही बसेसचंही मोठं नुकसान झालं असून अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेलं नाही. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक सुनील कडासने, उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी यांनी भेट दिली.
0 9 4 9 8 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *