वेतनावरुन तंत्रज्ञाचा खून; राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्षासह १३ जणांवर गुन्हा दाखल

Khozmaster
1 Min Read

 पुणे : वेतनावरून झालेल्या वादातून कंपनी मालकासह इतरांनी तंत्रज्ञाला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी (अजित पवार गट) शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यासह तेरा जणांवर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अविनाश भिडे (वय ३६, रा. धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शेखर जोगळेकर (वय ५८), प्रणव जोगळेकर (वय २२), दयानंद इरकल (रा. पांडवनगर), बाळू मिसाळ (वय ५४, रा. कर्वेनगर), प्रमोद शिंदे (वय २९, रा. शिवणे), रूपेश कदम (वय ३७, रा. वडारवाडी), संतोष ऊर्फ बंटी हरपुडे (वय ३८), प्रकाश नाडकर्णी, नकुल शेंडकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.सप्टेंबर २०२२ मध्ये अविनाश भिडे यांचे निधन झाले होते. त्याबाबत चतुःशृंगी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. भिडे यांच्या पत्नी रेश्मा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिडे हे शेखर जोगळेकर यांच्या कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करीत होते. या दोघांमध्ये वेतनावरून वाद झाले होते. भिडे यांना शिवीगाळ व माराहण करून कार्यालयातून बाहेर काढण्यात आले होते. गंभीर जखमी झालेल्या भिडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी तपास केला असता अविनाश यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर तपास करीत आहेत.

0 9 4 9 8 0
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *