ह्रदयस्पर्शी भेट!! मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी ९ दिवसांचे आमरण उपोषण केले. तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर सध्या गॅलेक्सी हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे उपचार चालू आहेत..!

Khozmaster
1 Min Read

जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पहिली दिवशी देखील संभाजीराजे उपोषणस्थळी अंतरवली ला गेले होते. मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करावे परंतु त्यांनी पाणी प्यावी अशी विनंती राजेंनी केली व राजेंचा आदर करत दादांनी एक दिवस पाणी घेतले देखील.

परंतु लढा आणखी तीव्र व्हावा म्हणून त्यांनी पाणी सोडले व त्यांची आरोग्यावर त्याचा परिणाम झाला. सध्या त्यांनी शासनाला वेळ दिला आहे व उपोषण स्थगित केले व हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

छत्रपती संभाजीराजे यांनी आज पहाटे पुण्याहून छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी व काही आवश्यकता असल्यास कळवावे, असे सह्रदयपुर्वक म्हटले.

आपल्या सहकाऱ्याविषयी छत्रपती संभाजीराजे यांची तळमळ प्रत्येकवेळी दिसून आलीय आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी छत्रपती संभाजीराजे कायम उभे आहेत, याचा प्रत्यय या भेटीने आला.

समाजाच्या मागण्या सोडवण्यासाठी आणखी जोमाने लढण्याचे व तब्येत राखण्याचे बळ नक्कीच या भेटीमुळे भेटेल!

बाकी आपला माणूस सदृढ असेल तर लढा मजबूत होणारच आणि समाजाच्या मागण्या मान्य करुन घेवूयातच!

जय शिवराय…!

0 9 4 9 8 0
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *