डॉ.होमी भाभा स्पर्धा परीक्षेत महेश इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

Khozmaster
1 Min Read
मुलांमध्ये विज्ञानाबद्दल रुची निर्माण व्हावी व अभ्यासाची योग्य पद्धत स्वतः तयार करण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने ही परीक्षा घेतल्या जाते .या परीक्षेमध्ये स्थानिक महेश विद्या मंदिर मेहकरच्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन इयत्ता दहावी मधून अभिषेक प्रदीप देशमुख , सुनील भागवत देशमुख , यश अरुण जाधव हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले . तर इयत्ता नववी मधून नैतिक समीर सावजी, इशा विकास खडसे ,कृष्णा दिनकर धोटे हे इयत्ता नववी मधून अनुक्रमे प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले .याच प्रमाणे इयत्ता आठवी मधून कनक राजेश चरखा , अफान झाकीर शेख व भक्ती सुरज काबरा हे विद्यार्थी देखील अनुक्रमे प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले .
             या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुभाष लोहिया, सर्व संचालक मंडळ प्राचार्य ज्योती मंत्री , उपप्राचार्य के .एम. गायकवाड यांनी सर्वांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या .या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक अश्विन हाडे ,समीर सावजी,दीपक रसाळ ,भाग्यश्री सुनाट,गौरी विटकरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे
0 9 4 9 8 0
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *