लावणी साखळी उपोषण सुरुच

Khozmaster
1 Min Read
 मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ भूमिका
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मंठा तालुक्यातील लावणी येथे सकल मराठा समाजबांधवांनी बेमुदत उपोषण साखळी सुरू केलेले आहे.
आरक्षणासाठी सरकारला ४० दिवसांची मुदत देऊनही सरकारकडून ठोस काम न झाल्याने समाजबांधव संतप्त आहेत. प्रतेक जिल्ह्यात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली ठिकठिकाणी निवेदन, उपोषणे, रास्ता रोको झाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमांना
काळे फासण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आजपासून मंठा तालुक्यातील लावणी येथे साखळी उपोषण चालूच राहणार आहे असे लावणी मधील सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले या वेळी लावणीतील सकल मराठा समाजाचे शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
0 9 4 9 7 7
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *