शहर प्रतिनिधी बार्शीटाकळी
आज दिनांक 05 नोव्हेंबर 2023 रोजी बार्शीटाकळी शहरातील विविध मतदार नोंदणी बुथ केंद्रावर निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील अधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी जिल्हा परिषद उर्दू मुलींची शाळा बार्शीटाकळी येथे निवडणूक नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय अकोला श्री अतुल सोनवणे यांच्यासंह बार्शीटाकळी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन बी एल ओ यांचे कामांचा आढावा घेतला यावेळी उत्कृष्ट काम करणारे बीएलओ अब्दुल रशीद अब्दुल बशीर तानजीम खान अनिक खान यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले यावेळी बार्शीटाकळी विनोद पाचपोरे
नायब तहसीलदार आकाश थोरात संगणक परिचालक निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय अकोला कैलास कदम मंडळ अधिकारी केंद्र प्रमुख शाहिद इक्बाल खान यांची उपस्थिती होती यावेळी शाळेचे मुख्याध्यापक काझी रिजवानोद्दीन काजी हफिजोद्दीन यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले शहरातील वाढीव नवीन मतदार नोंदणी इत्यादी बाबत प्रशासनाच्या वतीने बार्शीटाकळी येथील निवडणूक विभाग कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच इतर कामांना प्रगती देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले बार्शीटाकळी तालुक्यातील स्वीप पथक मार्फत जनजागृतीचे कार्य बाबत माहितीचे सादरीकरण यावेळी काजी रिजवनोद्दीन यांनी केले या वेळी राहुल्लह खान मो शाकिर युसूफ खान तोहीद खान बि एल ओ सुपरवायझर अनिल चाहकर इत्यादींची प्रमुख्याने उपस्थिती होती
Users Today : 8