नालासोपारा शहरात नागरी संरक्षण दल टिम सज्ज..

Khozmaster
2 Min Read
शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांचा कामाचे भिवंडी महापालिकेचे मा. आयुक्त रणखांब यांनी केले कौतुक…
शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख रूचिता नाईक यांच्या प्रयत्नातुन नालासोपारा येथे शिवसेना पक्षाच्या वतिने नागरी संरक्षण दल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
 नागरी संरक्षण दल महाराष्ट्र शासन, गृह विभाग पालघर यांच्या तर्फे आपत्ती काळात स्थानिक पातळीवर स्वयंसेवक निर्माण होण्याचा उद्देशाने नागरी संरक्षण दल पाच दिवसीय प्राथमिक मुलभूत प्रशिक्षण पुर्ण केलेल्या ४० स्वयंसेवक यांना महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले.
 नालासोपारा शहरात वाढते छोट्या मोठ्या अपघातांना प्रतिबंध बसावा यासाठी नालासोपारा शहरात नागरी संरक्षण दल टीम सज्ज करण्यात आली.
प्रशिक्षणा मध्ये आधुनिक युध्दनिती तंत्रज्ञान व नागरी संरक्षण कामगाज व कार्यप्रणाली, आग व आगीचे प्रकार, कृत्रिम श्वसन पध्दती व उपचार, विमोचन सेवा, आपत्कालीन जखमी व्यक्तीना वाहुन नेण्याचा पध्दती प्रथमोपचार तत्वे व साहित्य जखम व रक्तस्राव उपचार त्रिकोणीय बँडेज, दोरी व गाठीचे प्रकार या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या पोलीसांकडुन चारित्र पडताळणी झाल्यावर सर्वांना महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले.
नैसर्गिक आपत्तीच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी नागरी संरक्षण दलातर्फे देण्यात येणारे प्रशिक्षण केव्हाही व कुठेही उपयोगी पडू शकते. स्वयंशिस्त व स्वरक्षणातूनच आपण अधिक प्रभावीपणे आपत्कालीन परिस्थितीत काम करू शकतो, या प्रशिक्षणात महिलांचा सहभाग जास्त असल्याने समाजाप्रती असलेले भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी भिवंडी महापालिकेचे मा. आयुक्त श्री.अशोक कुमार रणखांब यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात आले.
नागरी संरक्षण दल अधिकारी काशीनाथ कुरकुटे, निलेश वझे, शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक, शनि मंदिराचे ट्रस्टी किशोर नाईक, शिवसेना वसई समन्वयक गणेश सुळे, महाराष्ट्र पोलीस बॉईज चे मनिष जैसवाल व प्रशिक्षण घेतलेले स्वयंसेवक उपस्थित होते.
0 9 4 9 7 7
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *