लोणार- निर्मल संचेती
जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू करून त्यांच्या उपोषणाला जवळपास दहा दिवस पूर्ण झाले सदर उपोषण त्यांनी सुरुवातीला पाणी न घेता उपोषण करण्याचे ठरवले व त्यांनी काही दिवस बिना पाणी घेता उपोषण सुद्धा केले प्रकृतीमध्ये बराच अशक्तपणा जाणवला लागल्यानंतर सर्व मराठा ग्रुप कडून जरांगे पाटील यांना पाणी घेण्यासाठी प्रयत्न झाले व त्या प्रयत्नाला यश सुद्धा आले व त्यांनी आमरण उपोषणामध्ये पाणी घेतले पाणी घेणे उपोषणात चालते जरांगे पाटील यांच्या उपोषण दरम्यान महाराष्ट्रभर मराठा ग्रुप कडून आंदोलन चक्काजाम सह अनेक आंदोलने झालीत त्यांना जबर सात सुद्धा मिळाली व ती मिळतच राहील त्यामधूनच माॅ तुळजाभवानी गावातील तेजस सतीश पोफळे तुळजापूरचे यांनी तर जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुटावे म्हणून त्यांनी संत गजानन महाराजांना साकड घातलं हे गणराया जरांगे पाटील यांच्या उपोषणाची सांगता होऊ दे व ती झाल्यास मी तुळजापूर ते शेगाव तुमच्या दर्शनाला पायपीट करत येईल व त्यांनी ते साकडे पूर्ण करण्यासाठी आज दिनांक 4 11 2023 ला लोणार मुक्कामी आले व आपल्या प्रतिक्रिया जैन अलर्ट ग्रुप आणि हनुमान उत्सव समितीचे सुंदर निर्मल संचेती मुकुंद पुरोहित यांच्याकडे दिल्या तुळजापूर येथून मी दिनांक 29 /10 /2023/ ला संत गजानन महाराज यांना घातलेलं साकड पूर्ण करण्यासाठी पायपीट निघालो आहे व दररोज मी सदर अंतर पार करण्यासाठी जवळपास 50 किलोमीटर अंतर चालत येतो आणि आज आनंदात लोणार ला पोहोचलो जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जे पाउल उचलले त्यांचे जितके अभिनंदन केले ते थोडेच आहे त्यांनी जरांगे पाटील बाबत आपले मनोगत व्यक्त करताना अश्रू अनावर झाले होते व शासनाने आता वेळ काढू धोरण अवलंबू नये असेही ते बोलेत व पुढे आपले साकड पूर्ण करण्यासाठी संत गजानन महाराज शेगाव साठी लोणार येथून निघणार
Users Today : 9