छत्रपती संभाजीनगर: वाळूज येथील चार वर्षीय बालिका करोना पॉझिटिव्ह आढळून आली असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. सध्या तिच्यावर वाळूज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सहा महिन्यांपेक्षा जास्त काळानंतर शहर तसेच जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. मात्र घाबरुन जाण्याचे कारण नाही, असेही आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.संबंधित बालिकेला करोनाची लक्षणे होती आणि तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी चाचणी सुचवल्यानंतर प्रत्यक्षात चाचणी केली असता, बालिका ही करोना पॉझिटिव्ह असल्याचे खासगी प्रयोगशाळेच्या अहवालावरुन स्पष्ट झाले. त्यानंतर तिच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून तिला इतर रुग्णांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे.दरम्यान, संबंधित बालिकेची प्रकृती स्थिर असून, तिला संसर्ग झालेला करोनाचा विषाणू हा जुना व सौम्य आहे. हा विषाणू धोकादायक नसल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले आहे.
करोना आता ‘एन्डेमिक’ झाला असून, अधून-मधून अशा सौम्य केसेस येत राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. पथकातर्फे सोमवारी सर्व बाबींची शहानिशा करुन सर्व प्रकारची खबरदारी घेत उपाययोजना केल्या जातील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये बालिका करोनाबाधित, प्रकृतीची माहिती देत डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट
0
9
4
9
7
4
Users Today : 5
Leave a comment