मातृत्त्वाचा सन्मान, महिलांप्रती आदर,शिवीमुक्त कट्टा सांगलीकरांचा अनोखा उपक्रम,स्वातंत्र्य दिनापासून अभियान

Khozmaster
2 Min Read

सांगली : महाराष्ट्रात शिव्यांचा इतिहास हा हजारो वर्षांचा आहे. अनेक इतिहास संशोधकांनी याबाबत मांडणी केलेली आहे. मुळातच शिवी एखाद्याचा अपमान करण्यासाठी चुकीच्या हेतून दिली जाते. स्त्री पुरुष समतेसाठी आपल्याकडे अनेक महामानवांनी संघर्ष केलेले आहेत. किरकोळ कारणांवरुन वाद झाला की त्या वादात किंवा तरुणांच्यात भांडणं झाली तरी अनेक जण आईवरून शिवी देताना सहज आपल्याला दिसून येतात. महिलांच्या सन्मानाच्या भूमिकेतून सांगलीत एका वेगळ्या आणि कौतुकास्पद उपक्रमाची सुरुवात झालीय. “सहज बोलताना शिवी, भांडणात शिवी, मैत्रीत शिवी. ज्या आईनं नऊ महिने पोटात वाढवलं, लहानाचं मोठं केलं, तिच्या नावानं शिवी!” आता बस्स करूया, कट्टा शिवीमुक्त करूया, असं वेगळं आवाहन सांगलीतील मशिद-ए-नमराहने केले आहे. त्याबाबत जाहीर फलक शहरात लावले आहेत. हा प्रयत्न सांगलीकरांचं लक्ष वेधून घेतोय, असं रहीम मुल्ला सांगतात.कमाई की बरकत कम करती है गाली… दुवाओंमे कबुलियत को रोकती है गाली… ‘तो शिवीशिवाय पाणी पित नाही’, ‘आमच्याकडे शिवी म्हणजे प्रेम’ असली फालतू फुशारकी मारणारे गल्लोगल्ली भेटतात. मैत्री किती घट्ट आहे, हे दाखवायला बेछूट शिव्या देत असतात. त्यात आईवरून शिव्यांची यादी मोठीच… या प्रकाराने अस्वस्थ होऊन सांगलीच्या मशिद-ए-नमराहने एक छोटा प्रयत्न केला आहे. त्याला ‘शिवीमुक्त कट्टा’ असे नाव दिलं आहे.नेकी की राह पर एक कदम’, असा आवाहन त्यांनी केले आहे. या फलकावर आईचे महात्म्य सांगणाऱ्या ओळी लिहिल्या आहेत. ‘प्रचंड वेदना सहन करून आई बाळाला जन्म देते. खूप कष्टाने, डोळ्यात तेल घालून त्याला सांभाळते, मोठे करते. स्वतः झिजते आणि बाळाला प्रेम देते. तिच्याबद्दल आदरच हवा. तिचे नाव घेऊन शिवी का द्यावी? आता ठरवूया, आई-बहिणीवरून शिवी द्यायची नाही. कुणी देत असेल तर त्याला शांतपणे समजून सांगायचे, असे आवाहन करण्यात आले आहे.या फलकाची व या वेगळ्या लक्षवेधी प्रयत्नाची सध्या सगळीकडे चर्चा होते आहे. मशिद-ए-नमराहने फाऊंडेशन चे सदस्य रहीम मुल्ला यांच्या फाऊंडेशनच्यावतीनं १५ ऑगस्ट पासून शिवीमुक्त कट्टा हा उपक्रमाला सुरु करण्यात आला आहे. रहीम मुल्ला यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून इतर उपक्रम देखील राबवले आहेत. शिवीमुक्त कट्टा या उपक्रमाद्वारे एक छोटासा पण महत्त्वाचा उपक्रम मशिद-ए- नमराह फाऊंडेशननं सुरु केला आहे.

0 9 4 9 7 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *