मुंबई: पनवेल येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे घरात पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्याने एका १० महिन्यांच्या बाळाचा बुडून मृत्यू झाला आहे. दुपारी जेव्हा आई झोपून उठली तेव्हा तिला आपला १० महिन्यांचा मुलगा प्लॅस्टिकच्या बादलीत डोके उलथून पडलेला आढळून आला.आशिक अल इमान असं या १० महिन्यांच्या बाळाचं नाव आहे. आशिक अल इमान याचे आई-वडील रोजंदारीवर काम करतात. त्याची आई दुपारच्या वेळी घरात झोपलेली असताना तो आईसोबत घरातच होता.
आई झोपी जाईपर्यंत बाळ जागे होते आणि घरात खेळत होते. जेव्हा आईला जाग आली तेव्हा तो तिला कुठेच दिसला नाही. तिने त्याला आवाज दिला, त्याचा शोध घेतला. काही वेळाने तिला बाळ पाण्याने भरलेल्या बादलीत पडलेलं दिसलं.
त्यानंतर तिने एका बांधकामाच्या ठिकाणी कामावर असलेल्या तिच्या पतीला याबाबतची माहिती दिली. पती तात्काळ घरी आला आणि बाळाला डॉक्टरांकडे नेले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळाला तपासून मृत घोषित केले
Users Today : 1