कारंजा :- दिनांक 4 नोव्हेंबर 2023 रोजी कारंजा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात कारंजा उप विभागीय अधिकारी वऱ्हाडे, तहसीलदार कुणाल झाल्टे,भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे, नायब तहसीलदार विनोद हरणे, आमदार पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांच्या उपस्थितीत उप विभागीय अधिकारी कुणाल झाल्टे यांनी कारंजा तालुक्यातील कामठा येथील अंगावर वीज पडून मृत्यू झालेल्या सारंगधर मोहनलाल मुंडाळे यांच्या वारसास शासनाकडून मिळालेल्या 4 लक्ष रुपये आर्थिक मदतीचा धनादेश दिला.कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री राजेंद्र पाटणी यांनी या प्रकरणी मदती करीता प्रयत्न केले.मौजे कामठा तालुका कारंजा येथील श्री सारंगधर मोहनलाल मुंडाळे वय 45 वर्ष यांचा दिनांक 29-9-2023 रोजी चार वाजता शेतामध्ये काम करीत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला . त्यांच्या पत्नी रुखमाबाई सारंगधर मुंडाळे राहणार कामठा यांना दिनांक 4 -11 -2023 रोजी चार लक्ष रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी वरघट पटवारी व अन्य उपस्थित होते असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी कळविले .
Users Today : 138