82 वर्षीय अंध वृद्ध आजीची दिवाळी वृद्धाश्रमात होणार साजरी वृद्ध आजी चे उर्वरित जीवन होणार सुखमय

KHOZ MASTER
1 Min Read
समाधान सुपेकर
चिखली (वंदना खरात ) – तालुक्यातील मौजे इसोली येथील 82 वर्षीय वृद्ध आजी ला मुलं मुली असे कोणतेही अपत्य नसल्याने तिच्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते तसेच वृद्धापकाळाने व दोन्हीही डोळ्याने अंध झाल्यामुळे प्रत्येकाने तिच्याकडे दुर्लक्ष केले ती घरोघरी जेवण मागून उदर निर्वाह करीत असे हे चित्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे चिखली तालुका अध्यक्ष समाधान सुपेकर यांना पाहवसे वाटत नव्हते त्यांनी तात्काळ तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांना इसोली येथे बोलावून सदर वृद्ध आजीची हकीकत दाखविली व वृद्धाश्रमात दाखल करण्यास विनंती केली त्यानुसार ग्रामपंचायत इसोली यांनी शिफारस पत्र दिले व स्थानिक पोलीस स्टेशन अमडापूर यांना संपूर्ण माहिती देऊन सदर वृद्ध आजीला तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात प्रवेश देण्यात आला यामुळे 82 वर्षीय वृद्ध आजीची दिवाळी आता तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात साजरी होणार व तिचे उर्वरित जीवन हे सुखमय व आनंदमय होईल यात शंका नाही असे मत समाधान सुपेकर यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी अमडापूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सचिन पाटील,काँग्रेस चे तालुका अध्यक्ष समाधान सुपेकर, भाजपा चे विनोद सीताफळे, पत्रकार संजय रसाळ , इसोली सरपंच माणिकराव खरात, दामू अण्णा येवले, रमेश शेळके, दिगंबर शेळके, अशोकराव घाणघावं, बिस्मिल्लाह कुरेशी, श्रीकृष्ण गुरव, रोडूबा वंजोळ, एकनाथ बोर्डे, दत्ता कोकाटे, पंजाबराव आराख यांनी विशेष सहकार्य केले.
0 9 7 2 3 3
Users Today : 31
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *