भाजपचे हजार सरपंच? ग्रामपंचायत निकालाबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

KHOZ MASTER
1 Min Read

 नागपूर : राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींपैकी एक हजारहून अधिक जागांवर भाजप समर्थित सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले. तसेच महायुतीचे १ हजार ७०० हून अधिक सरपंच आहेत, असा दावा पक्षाचे प्रदेधाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.बावनकुळे म्हणाले, की महाविकास आघाडीकडे असलेल्या ६० टक्के ग्रामपंचायती भाजप व महायुतीने खेचून आणल्या असून, निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतच त्यांना धक्का बसला, याकडेही बावनकुळे यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राबवलेल्या योजना थेट ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचल्याने हे यश मिळाले असून, अपेक्षेहून मोठा हा विजय आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
0 9 7 2 3 0
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *