लातूर: गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या आहेत. सत्तासारिपाटात अनेक प्यादी आपल्या चाली बदलत आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या राजकीय घडामोडीत अनेकजण अस्वस्थ होत आहेत तर अनेकांना पुन्हा राजकीय संधी चालून येत आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील राजकारणातही अशीच उलथापालथ होत आहे. भाजपच्या अंतर्गत गटबजीला कंटाळलेल्या विनायकराव पाटील यांना आपले राजकीय भवितव्य भाजपमध्ये धूसर झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याने ते राष्ट्रवादीतील गटबजीचा फायदा मिळवत पुन्हा एकदा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपची साथ सोडल्याची आज जाहीर करत आपण शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं.
पक्षांतर्गत गटबाजी आणि पक्षांतरामुळे दुरावलेला मतदार याचा विनायकराव पाटील यांना चांगलाच फटका बसला आणि राष्ट्रवादी काँग्रेचे उमेदवार बाबासाहेब पाटील विजयी झाले. जिल्ह्यात राजकीय प्रभुत्व असणाऱ्या नेत्याचं राजकीय वजन राखण्यासाठी मॅनेज राजकारण करत पक्षांतर्गत गटबाजीला राज्य नेतृत्वानेच साथ दिल्याचेही यातून स्पष्ट झाले. त्यामुळे कात्रीत अडकलेल्या विनायकराव पाटील यांना भाजपमध्ये राजकीय भवितव्या धूसर होत असल्याचे दिसू लागले. त्यात कहर म्हणजे दिलीपराव देशमुख यांचा पुन्हा भाजप पक्षप्रवेश. विशेष म्हणजे अनेक राजकीय मातब्बर राजकीय चेहरे भाजप जिल्हाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत असताना भाजपने दिलीपराव देशमुख यांना जिल्हाध्यक्षपदी बसवले आणि आपण आगामी विधानसभा लढविणार असल्याचही दिलीपराव देशमुख यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे भाजपने आपलं राजकीय भवितव्या संपुष्टात आणल्याची जाणीव विनायकराव पाटील यांना झाली.
भाजप पक्ष प्रवेशची खंत वाटत असतानाच पवार काका पुतण्यातील राजकीय वाद चव्हाट्यावर आला आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ झाली. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. अजित पवार भाजप- शिंदे सरकार सोबत सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीतील अनेक आमदार गेले, यात अहमदपूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेचे आमदार बाबासाहेब पाटील यांचाही समावेश झाला. त्यामुळे अहमदपूर मतदार संघात शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँगेस अस्तित्वहीन झाली. राष्ट्रवादीतील ही फूट विनायकराव पाटील यांच्या पथ्यावरच पडली. राजकीय वाटा बंद होत असताना चालून आलेल्या संधीचे राजकीय सोने करण्यासाठी विनायकराव पाटील यांनी भाजपला रामराम केला आणि शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता राष्ट्रवादी काँग्रेमध्ये ते पुन्हा आपले राजकीय भवितव्य आजमावतीलशरद पवार यांच्या गटाला बळ मिळणार
शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँगेसला विनायकराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशाने बळ मिळणार आहे. राष्ट्रवादीने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अहमदपूर मतदार संघातून तिकीट दिल्यास त्यांना काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचीही साथ मिळेल आणि त्यांच्या विजयाचा मार्ग दृष्टिपथात येईल.
Users Today : 132