Film City Recruitment 2023: फिल्मसिटीमध्ये नोकरीची संधी, जाणून या भरतीचा घ्या तपशील

Khozmaster
2 Min Read

Filmcity Recruitment 2023: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामध्ये (Maharashtra Film, Stage & Culture Development Corporation Limited Mumbai) म्हणजेच फिल्म सिटी येथे कंपनी सचिव पदाची भरती (Film City Mumbai Recruitment 2023) केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील तुम्हाला या लेखात पाहायला मिळेल.
फिल्म सिटी भरती अंतर्गत कंपनी सचिव (Company Secretary) हे पद भरले जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. फिल्मसिटी ही एक महाराष्ट्र सरकार अंडरटेकिंग संस्था असून ही भरती कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येत आहेतकंपनी सेक्रेटरी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षणसंस्थेतून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. शिवाय, अर्ज करणार्‍या उमेदवारकडे, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटर्स ऑफ इंडियाचे सहयोगी सदस्यत्व (Associate Membership of the Institute of Company Secretaries of India) असणे आवश्यक आहे. सोबतच, अर्जदारकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील एलएलबी पदवी हा एक त्याच्या निवडीसाठी फायदेशीर ठरू शकते. कंपनी सेक्रेटरी पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांना संबंधित कामाचा ५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना MFSCDCL ला लागू असलेल्या सर्व कायद्यांचे वैधानिक पालन, कंपनीच्या प्रशासकीय कार्यांची जबाबदारी, विविध वैधानिक प्राधिकरणांसह, न्यायालयीन प्रकरणे, सर्व करार दस्तऐवजांचे योग्य परिश्रम/मसुदा तयार करणे आणि कायदेशीर घटनचे पालन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी कंपनी सेक्रेटरीची असले.

Film City Recruitment 2023: पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

उमेदवारांसाठी अर्जाचा नमुना महामंडळाची अधिकृत वेबसाइट www.fimcitymumbai.org आणि www.maharashtra.gove.in वर उपलब्ध आहे. उमेदवारांनी आपला अर्ज महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव (मुंबई) – ४०००६५ या पत्त्यावर पाठवायचा आहे. २८ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ५ वाजल्यापर्यंत ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या

0 9 4 9 5 5
Users Today : 127
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *