चोर दिवाळी ..

KHOZ MASTER
1 Min Read
दिवाळी येई रंगात
खरेदी गर्दी जोरात
सपरिवार लोकांची
वरात ती बाजारात
विक्री येता खुशीत
विक्रमी वाढ दरात
असे हवे  तसे  हवे
विवाद  घरा  घरात
मारले जाई पाकिट
कुणी आनंद भरात
चोरांचा सुळसुळाट
रंगलेला दिवस रात
बिघडून  जातो मूड
खराब होते हालात
कष्टाचेपैसे पाण्यात
चोर  हसतो गालात
चोरांची हो दिवाळी
फुकटात हो  खैरात
सगळे रहावे सुखात
गा गाणी तालसुरात
सांभाळू  रहा  स्वतः
एवढे आपले हातात
ऑनलाईन व्यवहार
येई प्रसिद्ध  झोतात
– हेमंत मुसरीफ पुणे .
  9730306996.

0 9 7 2 2 6
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *