सेवा स्वरुप ..

KHOZ MASTER
1 Min Read
बदले नवीन युगात
ग्राहक सेवा स्वरुप
ऑन लाईन जगात
अद्भुत असे प्रारूप
ग्राहक विक्रेते नाते
अजूनि वाटे अप्रुप
अतूट भावबंधन ते
नको द्यायला फ्रुफ
बदलावे व्यवसायां
नवीन काळानुरूप
सोपा होई विनीमय
शिकण्यां येई हुरूप
सर्वत्र कार्यरत असे
गुन्हेगार अतिकुरुप
फसवावे नव प्रकारे
घोटाळे अनेक खूप
जाळ्यात मृगजळी
सापडू शके गुपचूप
होता सज्ञानी साक्षर
चोरबसती चिडीचूप
सायबर कायदे उभे
सक्षम अन् अनुरूप
सतर्क रहावे आपण
जागरूक तसे तद्रूप
– हेमंत मुसरीफ पुणे.
  9730306996.
0 9 7 2 2 6
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *