कारंजा :- दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी कारंजा नगर परिषद कारंजा जिल्हा वाशीम च्या वतीने येथील महेश भवन येथे नगर परिषदेच्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा उपदानाची रक्कम प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजीत केला.नगर परिषदेच्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा उपदानाची रक्कम कारंजा मनोरा विधान सभा मतदार संघाचे आमदार माननीय श्री राजेंद्र पाटणी साहेब यांचे शुभ हस्ते धनादेश द्वारे देन्यात आली.
या कार्यक्रमात आमदार राजेंद्र पाटणी यांनी उपस्थित न प कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या त्यांच्या समस्या व्यास पिठावरून बोलण्याची संधी दिली. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगीतले की, येथे कार्यरत अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याची जबाबदारी पार पाडावी आणि कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्याची जबाबदारी पार पाडावी. सफाई कर्मचाऱ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांची जबाब दारी पार पाडावी. येथील सफाई कामगारांच्या मते त्यांनी
देशात 20वा नंबर आणला होता असे यांचे म्हणणे आहे. देशात 10वा नंबर आणा . गाव का अच्छा चित्र खडा करना है| हे या कर्मचाऱ्यांमुळे शक्य आहे. हे तुम्हा आम्हास शक्य नाही असे त्यांनी व्यास पिठावरील अधिकारी व उपास्थित मान्यवरांकडे अंगुली निर्देश करीत सांगितले. तेव्हा सर्वांना विश्वासात घेवून काम करा असा सल्ला त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला . कर्मचारी नियुक्त्यावर संशय दाखवत त्यांनी पुढे सांगितले की, ही कोणती पद्धत आहे पोष्टिंग देवुन टाकायची. पोष्टींग कशी दिली याची चौकशी केली तर तुम्ही अडचणीत याल. मला तर असे वाटते तुम्ही तक्रार द्या बनवून मै सबको घोडे लगा देता. ऐसा नही होता ना| जिसकी जगा है उसे मिलनी चाहिए|इसमे मैं ख्याल दुंगा| आपणा कडून आज आलेल्या सर्व तक्रारींची दखल घेवू. अधिकाऱ्यांना निर्देश देत त्यांनी पुढे सांगितले की, सफाई कामगारांच्या जागेवर कोणासही सफाई कामगारांशिवाय पोस्टिंग देवू नका. मला यातील माहीत आहे. मी येथील 20 वर्षापासून आमदार आहे. कशाला कोणावर अन्याय करता त्यांचा हक्क त्यांना मिळू द्या. येथील नियुक्त्यास जबाबदार असणाऱ्या नगर परिषदच्या राज्यकर्त्यांना त्यांनी नाम निर्देश न करता ठणकावले. पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, यामुळे सफाई कामगारांची संख्या कमी होते आणि गाव वाढत चाललं आहे. असे त्यांनी सांगितले.सफाई कामगारांची संख्या जास्त असावी असे त्यांच्या गाव वाढीवर बोलण्यावरून वाटते. या शिवाय अनेक विषयावर आमदार राजेन्द्र पाटणी बोललेत. त्यांनी सांगितले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे सफाई कामगारांसाठी केले ते आज पर्यंतच्या राज्याच्या कोण्याही मुख्यमंत्र्यांने केले नाही.यावर टाळ्यांच्या ककडाटात उपस्थित सफाई कामगारांनी टाळ्या वाजवून दाद दिली. या कार्यक्रमात भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे, भाजपा शहर अध्यक्ष ललित चांडक, बंटी ढेंदुळे , उप मुख्य अधिकारी निशीकांत परळीकर, न.प.इंजिनिअर घोघरे साहेब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक घोगरे यांनी केले. संचलन हेमंत चवरे यांनी केले. कार्यक्रमात मार्गदर्शन आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांनी केले . कार्यक्रमात न प चे सेवा निवृत्त कर्मचारी, अधिकारी, सफाई कामगार मोठ्या संख्येने होते. या कार्यक्रमात कर्मचारी यांची बाजु शाम घारू यांनी भक्कम पणे मांडली व नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या सांगीतल्या त्या समस्या सोडविण्याचे सांगितले. केळकर यांनी निवेदन देवून समस्या सांगितल्या. यावेळी अनेकांनी अनेक समस्या सांगितल्या. त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिले काही अडचण असल्यास संपर्क करण्याचे सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित न प अधिकाऱ्यांनी व्यासपिठावरील मान्यवरांचा सत्कार केला, स्वागत केले. उपस्थित काही कर्मचाऱ्यांनी सुद्धा आमदार राजेंद्र पाटणी साहेबांचा पुष्प गुच्छ देवुन स्वागत केले. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे सोबत सर्व श्री. भाजपा उपाध्यक्ष राजीव भेंडे , अनिल कानाकिरड , समिर देशपांडे , दिनेश वाडेकर, मंगेश धाने, संजय भेंडे, सुरेश गिरमकार, राहुल रविराव,रायदास आदी उपस्थित होते. असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले.
Users Today : 118