शहर प्रतिनिधी बार्शीटाकली
बार्शीटाकळी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालय मधील सैय्यद शकील सैय्यद हकीम उर्फ नदीम यांना कांग्रेस शिक्षक सेल तर्फे दिल्या जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार रविवारी अकोला जिल्हा येथे आयोजित कार्यक्रमात पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक काँग्रेस पक्षाच्या मान्यवर नेता मंडळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांची प्रशंसा होत आहे ते आपले पुरस्काराचे श्रीय बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचे प्राचार्य गजेंद्र काळे यांना देत आहे त्यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल आज उर्दू शिक्षक संघटना व खालिद बिन वलिद शिक्षण संस्था यांचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी काजी रिजवानोद्दीन शहीद इक्बाल राहुल्लह खान मो फारूक सखाउल्लाह खान अब्दुल रशीद शब्बीर अहेमद खान वाकार उल्लाह खान सयद इसरार मुजीब बेग आदींची उपस्थिती होती या वेळी कार्यक्रमा चे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन मुजीब बेग यांनी केले या वेळी मोठ्या संख्याने शिक्षकांची उपस्थिती होती
Users Today : 117