सैय्यद इमरान
मालेगाव प्रतिनिधी
यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे शेतीला नुकसान तर झालेच परंतू सद्यस्थितीत पाणीसाठा अल्प असल्याने गुरा, ढोरांना चारा मिळत नाही त्यामुळे १ महिन्याच्या आत मालेगाव तालुका सरसकट दुष्काळ जाहीर करा अशी मागणी निवेदनाद्वारे काँग्रेस पदाधिकारऱ्यांनी केली आहे.
सोबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, चालु वर्षात 2023 यावर्षी पावसाचे प्रमाण खुपच कमी आहे व खरिपाची पिके कशीबशी तग धरुन अर्धवट आली आहेत. त्यामध्ये आज मालेगाव तालुक्यात पाणी साठा अल्प असून जनावरांना, माणसांना पाणी टंचाईचा सामना आज भितीला करावा लगत आहे.
खरीप पिके कशेबशे निम्मे निघाले परंतु रब्बीचे पिके पेरणी केली परंतु पाऊस नसल्यामुळे पिके उगले नाही. जमिनीमध्ये पुरेसार ओलावा नाही सोयाबीन या मुख्य पिकाला भाव मातीमोल आहेत. त्यमुळे शेतकरी मरनयातना भोगत आहे. पिण्याच्या पाण्याची व फळबाग जीवंत ठेवण्यासाठी तातडीने उपाय योजना करावी व शेतकऱ्यांना धीर द्यावा, रोजगार हमीच्या माध्यमातुन रोजगार उपलब्ध करुन द्यावा. १ महिन्याच्या आत मालेगाव तालुका सरसकट दुष्काळ जाहीर करा यावर्षी पावसाच्या लपंडाने खरिप हंगाम हातचा गेला असून तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहिर करुन दुष्काळी सुविधा पुरविण्याची मागणी मालेगाव तालुका कॉंग्रेसच्या वतीने आज तहसीलदार यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आले आहे.
या बाबत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीपराव घुगे यांच्या नेतृत्वामध्ये सोमवार ला मालेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये यावर्षी तालुक्यात अपुऱ्या पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पिकांचे प्रचंड नुकसान झाले. खरिपात शेतक्याचे उत्पन्न घटले आहे. अत्यल्प जलसाठा व विजेचे लपंडाव या कारणाने रब्बी हंगामही संकटात आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला कर्जबाजारी झालेला आहे. त्यामुळे मालेगाव तालुका तत्काळ दुष्काळ घोषित करून शेतक्यांना आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच पिक विम्याची अग्रीम २५ टक्के रोखणाऱ्या संबंधित विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे. शेतकऱ्यांना बारा तास अखंड वीज पुरवठा करण्यात यावा. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, खरीप पिकांचा प्रश्न, पिकविम्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मालेगांव तालुका दुष्काळ जाहीर करा
व शेतकऱ्यांना दुष्काळी
अनुदानापोटी प्रति हेक्टरी १ लाख रुपये खात्यावर तात्काळ द्यावेत. या निवेदनाद्वारे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष संदीपराव घुगे, जगदीश बळी, माजी सभापती सुरेश शिंदे, विनायक कुटे, सुभाष वाझुळकर, उत्तम नाईक, प्रकाश पाटील अंभोरे, गजानन शिंदे, सैय्यद गुलाब भाई, राजकुमार दहात्रे, अख्तर खा पठाण, शशिकांत टनमने, भारत गुडदे, योगेश बळी, गोपाल कुटे,अमोल लहाने, बाबा भाई, सागर जगताप, पंजाबराव घुगे, शरीफ पाठण,आदिंसह काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 116