महाराष्ट्रातील सर्वात मोठी भगवान बाहुबलीची प्रतिमेच्या पूर्णत्वासाठी पंचकल्याणक समितीची स्थापना !

Khozmaster
3 Min Read
सैय्यद इमरान
मालेगाव प्रतिनिधी
पुसेगाव हे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या नवनिर्मित जैन तीर्थक्षेत्राचे भव्य बांधकाम श्रमण मुनिश्री १०८ विशेष सागरजी मुनिराजांच्या पावन आशीर्वादाने सर्वज्ञ तीर्थाचे बांधकाम पूर्णत्वास येत आहे सर्वज्ञ तीर्थ पुसेगाव येथे परमपूज्य वात्सल्य शिरोमणी श्रमण मुनी श्री १०८ विशेष विशेष सागरजी गुरुदेव ससंघ यांच्या सान्निध्यात पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाची पहिली बैठक ४ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न झाली.याप्रसंगी ऋषभदेव मांगी तुंगीचे सात पैकी ५ विश्वस्त व मांगीतुंगीचे पिठाधीश रवींद्र कीर्तीजी स्वामी,अभियंता सी.आर.पाटील पुणे, डॉ. जीवन प्रकाश जैन,संजय पापडीवाल औरंगाबाद,
अनिल जैन दिल्ली आणि न्यायमूर्ती कैलाशचंद जी चांदीवाल आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ३ वाजता पंडित अर्थव जैन यांच्या सुमधुर मंगलाचरणाने झाली परमपूज्य गणाचार्य श्री १०८ विराग सागर जी महामुनिराज यांच्या प्रतिमेचे अनावरण व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले बाहेरून आलेले प्रमुख पाहुण्यांचा चातुर्मास समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.या प्रसंगी स्वस्ति श्री रविंद्र कीर्ती स्वामी यांनी उपस्थितांना संबोधित करून भगवान बाहुबली ची मुर्ती पाहून मन प्रसन्न झाल्याचे सांगितले विशेष सागर जी महाराज येथे विराजमान आहेत अनुभवी असून गेली ९ वर्षे ते महाराष्ट्रात पद विहार करीत असून विहाराने समाज प्रबोधनाचे काम केले असून अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार,बांधकाम आणि पंचकल्याणक केले आहे पुसेगाव येथील पंचकल्याणक विशेष आणि ऐतिहासिक ठरेल,असा आमचा विश्वास आहे या निमित्ताने श्रमण मुनी श्री १०८ विशेष सागर जी मुनिराज यांनी धार्मिक सभेला संबोधित करताना सांगितले की जैन धर्मातील सर्वात महत्वाची आणि मोठी पूजा म्हणजे पंचकल्याणक जो व्यक्ती या पूजेमध्ये मन,वाणी आणि शरीराने सहकार्य करतो,एक दिवस त्याचा पण पंचकल्याणक साजरा केला जातो महाराष्ट्रावासी भाग्यशाली आहे की महाराष्ट्रातील भगवान बाहुबलीच्या सर्वात मोठ्या मूर्तीचे बांधकाम पूर्ण झाले आहे,ज्यांची भव्य आणि दिव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा आणि गजरथ महोत्सव मे २०२४ मध्ये परमपूज्य भारत गौरव,विशाल संघनायक,गणाचार्य विराग सागर जी महामुनिराज ससंघ यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे तुम्हा सर्वांना सातीशय पुण्य कमावण्याची संधी मिळत आहे,आम्हाला तुम्हां सर्वांच्या सहकार्याची गरज आहे,पूज्य मुनी श्रींच्या प्रवचनानंतर पंचकल्याणक समितीची स्थापना करण्यात आली सर्व प्रथम सल्लागार जितेंद्र जी पापळकर जिल्हाधिकारी हिंगोली,राजेंद्र पाटणी वाशिम (आमदार),शिरोमणी संरक्षक मुकुंद सावजी जिंतूर,परम संरक्षक संतोष पेंढारी नागपूर,संरक्षक कैलास भुरे पुसेगाव,अध्यक्ष जितेंद्र जी छाबडा वाशिम,कार्याध्यक्ष रवि कान्हेड पुसेगाव,
उपाध्यक्ष धर्मचंद जी गंगवाल परभणी,सुदर्शन राळेकर कारंजा,प्रसन्ना आग्रेकर कारंजा,संघटन मंत्री सुदर्शन कान्हेड पुसेगाव,सरचिटणीस हितेंद्र गंधक कारंजा,
कोषाध्यक्ष पंडित रविंद्र जैन अकोला,संजय वाळले पुसेगाव आणि नव गठित पदाधिकारी यांनी पूज्य मुनी श्रींच्या चरणी श्रीफळ अर्पण करून पंचकल्याणक कार्यक्रम सानंदाने संपन्न होण्यासाठी आशीर्वाद प्राप्त केले कार्यक्रमाचे संचालन देशभरात प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय कलाकार राजेंद्र जैन उमरगा यांनी केले याप्रसंगी पंचकल्याणक पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
0 9 4 9 4 5
Users Today : 117
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *