सैय्यद इमरान
मालेगांव प्रतिनिधी: दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, खरेदीसाठी नागरिकांची बाजारात मोठी झुंबड उडत आहे. व्यापाऱ्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारांचे डिस्कॉऊंट जाहीर केले आहे. मंगळवार बाजार असल्यामुळे गांधी चौक, शिव चौक, सराफा लाईन, जुने बस स्टॅण्ड, गोयंका नगर, आठवडी बाजार यासह शहरातील विविध भागात खरेदीदारांची मोठी गर्दी दिसून येत आली. सध्या बाजारपेठ सजली असून गेल्या दोन दिवसांपासून मिळालेल्या बोनसमुळे ग्राहकांची तूफान गर्दी झाली असून दररोज कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची माहिती व्यापारी मंडळाने दिली.
शहरातील मुख्य रस्त्यासह विविध ठिकाणच्या कपडे, पणती, रांगोळी, सुगंधी तेल, आकाश कंदील, फटाके आदींचे स्टॉल गांधी चौका तसेच तहसील कडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले आहे. शहरातील विविध भागात कपडे, विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य, बालगोपालासाठी ड्रेस, फटाके, सुंगधी तेल, आकाश कंदील, पूजेचे साहित्य, रंगबिरंगी रांगोळ्या आदींचे स्टॉल उभारण्यात आले आहे.
दुकानदारांनी आपल्या दुकानाकडे ग्राहक आकर्षक व्हावा यासाठी आकर्षकपणे दुकाने सजविण्यावर भर दिल्याचे पाहायला मिळाले. सध्या बाजारपेठेत खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी वाढत आहे. बाजारात येणाऱ्या ग्राहकांचे आकाश कंदिल लक्ष वेधून घेत आहे.
गांधी चौक आणि शहरातील अन्य भागात असलेली दुकाने विविध प्रकारच्या आकाश कंदिलांनी सजलेली दिसून येत आहे. यावर्षी हाताने तयार केलेल्या आकाश कंदिलची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसून आले. सोनेरी फ्रेम असलेले आकाश कंदील बाजारात येणाऱ्या ग्राहकाचे लक्ष वेधून घेत आहे.
रंगबिरंगी आकाश कंदीलाबरोबरच पंधराशेहून अधिक प्रकारात आहेत. दोनशे रूपयापासून ते तीन हजारांपर्यंत आकाश कंदीलची किंमत आहे. दुकानाच्या दर्शनी भागावर लटकवलेले आकाश कंदिलांना विविध प्रकारच्या आधुनिकतेचा साज चढविल्यामुळे ते आणखीनच आकर्षक दिसत आहे.
बॉक्स
*पारंपरिक साहित्याची जागा आधुनिकतेने घेतली*
दिवाळीत पणती पेटवून दीपोत्सव केला जातो. पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या पणती-बोळक्याची जागा आता बाहेरून आयात करण्यात आलेल्यानी घेतली आहे. त्यामुळे पारंपरिक पध्दतीने तयार करण्यात येणाऱ्या पणती बोळक्यासह अन्य साहित्याकडे मात्र ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे पारंपारिक कुभांराचा व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
Users Today : 116