अर्धवट शरीर असलेल्या नऊ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळला; परिसरात घटनेनं खळबळ

Khozmaster
1 Min Read

जळगाव: यावल तालुक्यातील सातोद गाव शिवारात प्राण्यांनी खाल्लेले नऊ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावल पोलिसांनी तात्काळ गावात जाऊन त्या बाळाचे अर्धवट अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील सातोद येथील इंदिरानगर परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी यांना नऊ महिन्याच्या बाळाचा मृतदेह आढळला. अर्ध शरीर असल्याने इतर शरीराचा मृतदेह प्राण्यांनी खाल्लेले असल्याचे ही समोर आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बाळाचा मृतदेह ताब्यात घेत यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणला आहे.

हे मयत बाळ हे कुणाच्या तरी अनैतिक संबंधातून जन्मास आले असावे. समाजात बदनामी होईल या भितीपोटी या बाळास अशा प्रकारे जन्म दिल्यावर बेवारस सोडून दिले असावे असा अंदाज केला जात आहे. त्यानुसार पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हॅड कॉन्स्टेबल राजेन्द्र पवार यांच्यासह पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. यावल पोलीस ठाण्यात या घटनेशी संबधित बाळाच्या मृत्यूस कारणीभूत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 9 4 9 0 2
Users Today : 74
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *