अकोला प्रती – दि.05/11/2023
निस्वार्थ रुग्णसेवा परिवाराच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम शिवापूर इथे 500 रक्तदाताचा सत्कार सोहळा घेण्यात आला.यामध्ये रुग्णसेवेत तथा सामाजिक कार्यात सदैव कार्यरत असणारे उमेश सुरेशराव इंगळे यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गांवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र ग्रुपची सेवा ही खूप चांगल्या प्रकारे सुरू असून 500 रुग्णांना मोफत रक्तदान केले आहे आणि 25 गावांमध्ये काम सुद्धा सुरू आहे त्यानिमित्त निस्वार्थ रुग्णसेवा परिवाराच्या वतीने 200 रक्तदातांचा व आरोग्य क्षेत्रामध्ये समाजकार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार सोहळा व स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी.पाटील समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी अमर दादा इंगळे,गायत्री राजकुवर,सपना मगर,यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल भटकर यांनी केले. उपस्थिती कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा.श्री.संग्राम भैय्या गावंडे, माजी महापौर भारतीय जनता पार्टी श्री.विजय भाऊ अग्रवाल,भावी नगरसेवक श्री.पंकज दादा गावंडे,श्री.गुरुमाऊली, सन्मित्र हॉस्पिटल डॉ.दीपक केळकर सर, सचिनजी निगोट,नगरसेवक श्री.वैकुंठ भाऊ ढोरे,श्री.अरुण भाऊ कडू, नगरसेवक श्री.विनोद दादा मापारी,श्री.पिंटू दादा शिंदे, पै.युवराज दादा गावंडे,प्रा.डॉ.संकेत दादा काळे,प्रा.डॉ.रोहित दादा काळे, श्री.एकनाथजी शिंदे साहेब गटाचे निखिल भैय्या ठाकूर, नगरसेवक श्री.धनंजय दादा धबाले,नगरसेवक श्री.गणेश पावसाळे,श्री.वैभव दादा माहोरे,अमोल दादा क्षिरसागर,नटेश्वर नाट्य कला थेटर डॉ.सचिन पाटील व स्नेहल मॅडम,उद्धव साहेब ठाकरे गटाच्या सौ. देवेश्रीताई ठाकरे, नगरसेविका सौ.शारदाताई ढोरे, प्रा.डॉ.संदीप भोवते सर, श्री.गणेश दादा अंधारे,श्री.राजेश काका घोगरे,प्रा.डॉ.प्रेमसिंग जाधव सर,प्रा.नवनाथ बडे सर, प्रा.प्रफुल पवार सर,प्रा.डॉ.कविता कावरे,प्रा.डॉ.अर्चना धर्मे, सौ.सविताताई अढाऊ, करण दादा दोड,प्रेम दादा गावंडे,प्रथमेश इंगळे, शासकीय स्त्री रुग्णालय श्री. दिलीप जी कंकर सर, डॉ.सुजाता वानखडे मॅडम, मातोश्री वृद्धाश्रम सेविका सौ.निशाताई कुचर, अकोला ब्लड बँक चे संचालक श्री.सिद्धिविनायक स्वामी, साई जीवन रक्तपेढी सर्व टीम व निस्वार्थ रुग्णसेवा परिवारातील सर्व पदाधिकारी व महिला पदाधिकारी, मित्रमंडळी ज्येष्ठ नागरिक व इतर टीम उपस्थिती होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री दत्तगुरु डी.एड कॉलेजचे प्राचार्य प्रा.विजय अग्रवाल सर यांनी केले.
Users Today : 52