यंदा ही शिंदे सरकारकडून गोरगरिबांची दिवाळी गोड. उदयसिंह बोराडे पा.

Khozmaster
1 Min Read
आनंदाचा शिंधा लवकरात लवकर वाटप करा, यापासून कोणीही मुक्ता कामा नये..}
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे साहेबांनी यंदाही दिवाळी राज्यातल्या नागरिकांना शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिदा दिला यामध्ये दोन नव्या पदार्थही वाढवली पूर्वी चार वस्तू यामध्ये साखर तेल चणाडाळ रवा यासारखे जिनस होते आता नव्याने मैदा आणि पोहे याचाही समावेश शिंदे सरकारच्या वतीने करण्यात आला. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्यातील शीत पत्रिका धारकांना शिंदे सरकारच्या वतीने आनंदाचा शिधा दीपावली सणा निमित्त देण्यात आला. 25 ऑक्टोंबर याची वाटप करण्याचे सूचना सरकार वतीने देण्यात आल्या मंठा शहरातील सुधीर जोशी, किशोर जोशी, आंन्साबाई राठोड यांच्या रेशन दुकानांमध्ये ता.८ रोजी तालुकाध्यक्ष उदयसिंह बोराडे यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप करून म्हणाले की, मंठा तालुक्यातील रेशन दुकान चालकांनी कुठलीही हायगय न करता आनंदाचा शिधा सर्वांना वितरित करावा यापासून कोणी मुकणार नाही याची खबरदारी घेऊन वाटप करावा सर्वसामान्य गोरगरिबांची दिवाळी गोड करावी. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे, दलित आघाडी प्रमुख दिलीपराव हिवाळे,शिवसेना उप तालुका प्रमुख विलासराव राठोड, युवा सेना तालुकाप्रमुख दीपक गायकवाड ,युवा उप तालुका प्रमुख लिंबाजी बोराडे, युवा सेना शहर प्रमुख एडवोकेट राजेश खरात, सुनील गुंड, उमेश राठोड ,व शहरातील नागरिक उपस्थित होते
0 9 4 8 8 0
Users Today : 52
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *