वन विभाग तसेच गो ग्रिन फाउंडेशन कारंजा यांच्या संयुक्त सहभागाने आज स्थानिक स्व प्रकाश दादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्र येथे पक्षी निरीक्षक डॉ शार्दुल डोणगावकर सर यांनी काढलेले पक्षी छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सध्या सुरू असलेल्या ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र पक्षीमित्र या संस्थेद्वारे सुद्धा हे नियोजन करण्यात आले होते. यासाठी करंजा तील महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे सदस्य पक्षीमित्र आशिष बंड जैन व डॉ शार्दुल डोणगावकर यांनी पुढाकार घेतला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रदर्शन कार्यक्रमाचे सविस्तर प्रस्ताविक पक्षीमित्र आशिष बंड यांनी केले. त्यात त्यांनी पक्षी सप्ताहाच्या प्रयोजना बद्दल सविस्तर माहिती दिली. ५ नोव्हेंबर हा आदरणीय पक्षी तज्ञ लेखक , अरण्यक मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस तसेच १२ नोव्हेंबर हा बर्ड मन , भारतीय पक्षी शास्त्राचे जनक स्व सलीम अली यांची जयंती असा एक सप्ताह या दोन महान पक्षी तज्ञांना आदरांजली म्हणून विविध पक्षी विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पक्षी जैवविधतेतील महत्वाचा घटक आहे. त्यांच्या विविध ते बद्दल सर्वांना माहिती व्हावी म्हणून त्यांची छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असे ते म्हणाले.
या नंतर कारंजा वन परिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे साहेब यांनी पक्षी सप्ताह, पक्षी निरीक्षण याबद्दल माहिती देऊन वन विभाग अश्या प्रकारच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देते असे सांगितले.
यानंतर प्रमुख उपस्थितीत असलेले भारत गॅस चे संचालक तसेच गो ग्रीन फाउंडेशन चे ज्येष्ठ सदस्य शेखर भाऊ बंग व प्राचार्य अशोक देवरे सर यांनी पक्षी मित्रांचे कौतुक करून प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.
शेवटी पक्षी छायाचित्रकार डॉ शार्दुल डोणगावकर सर यांनी आपले मत व्यक्त करताना पक्षी छायाचित्र प्रदर्शन मागील आपली भूमिका स्पष्ट केली. परिसरातील तसेच इतर ठिकाणच्या विविध पक्षांचे फोटो काढून त्यांचे विविधांगी सौंदर्य सर्वांना बघायला मिळाले पाहिजे म्हणून हे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
कारंजा तील विविध संस्था संघटना एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करतात. गो ग्रिन फाउंडेशन, वन विभाग, पक्षी मित्र असे सर्व तसेच व्यासपीठावरील व कार्यक्रमाला उपस्थित मान्यवारांचे आभार आशिष बंड यांनी आयोजकांकडून आभार मानले.
कऱ्यकामाचे संचालन गो ग्रिन फाउंडेशन कारंजा चे सदस्य उदय गर्जे यांनी केले.
या नंतर प्रदर्शनाचे उद्घाटन मान्य वरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला कारंजा तील पक्षीमित्र, निसर्ग प्रेमी, गो ग्रीन फाउंडेशन चे सदस्य, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी, डॉ असो चे सदस्य तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांचे मनःपूर्वक आभार..!
Users Today : 50