बुलढाणा दि. 8 (जिमाका): मध्यप्रदेश राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2023 चा कार्यक्रम घोषीत झालेला आहे. त्यानुसार दि. 17 नोव्हेंबर रोजी मतदान व दि. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूका खुल्या, मुक्त, निर्भय वातावरणात शांततेत पार पाडण्याच्या अनुषंगाने मध्यप्रदेश राज्यातील बुऱ्हाणपूर जिल्ह्याच्या सीमेपासून 5 कि.मी.च्या परीसरातील मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे.
मध्यप्रदेश येथील बुऱ्हाणपूर जिल्ह्याच्या सीमेपासून 5 कि.मी.च्या परीसरातील भागात मतदानाची वेळ संपण्यापुर्वी 48 तास अगोदर दि. 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजतापासून बंद राहील. मतदानाच्या पूर्वीचा दिवस 16 नोव्हेंबर रोजी व मतदानाच्या दिवशी दि. 17 नोव्हेबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे. तसेच दि. 3 डिसेंबर रोजी मतमोजणीचा दिवशी बुऱ्हाणपूर जिल्ह्याच्या सीमेपासून 5 कि.मी.च्या परीसरात मद्य विक्री बंद राहील. आदेशाची मद्य विक्री अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध दारु बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे.
00000
जिल्हास्तरीय रेड क्रॉस समिती गठीत करण्यासाठी शुक्रवारी बैठक;
सामाजिक क्षेत्रात सेवा करणाऱ्या नागरिकांनी उपस्थित राहणाचे आवाहन
बुलढाणा दि. 8 (जिमाका):- इंडियन रेड क्रॉस सोसायटीची जिल्हास्तरीय शाखा गठीत करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ सेवा करणाऱ्या नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
इंडियन रेड क्रॉस सोसायटी कायदा 1920 अंतर्गत रेड क्रॉस सोसायटी संपूर्ण भारतात कार्यरत आहे. ही सोसायटी राज्य व जिल्हास्तरीय शाखेच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कामातुन आपले सामाजिक दायित्व पूर्ण करत असतात. राज्यपाल यांच्या सुचनेनुसार जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात येत आहे. सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या नागरिकांची समिती गठीत करायची आहे. त्यानुसार इच्छुक नागरिकांनी आपल्या ओळखपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे. बैठकीत उपस्थित असलेल्या नागरिकांमधुन जिल्हा कार्यकारणीची प्राथमिक स्वरुपाची निवड करण्यात येईल. त्यानंतर जिल्हा स्तरीय संघटना गठीत करण्यात येईल. समितीमध्ये निवड झालेल्या नागरिकांना स्वखर्चाने इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्यत्व स्विकारता येईल. अधिक माहितीसाठी डॉ. प्राची तायडे(7798141367), डॉ. विनोद जवरे(9422325650) रविंद्र लहाने(9422884421) यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा.
000000
मराठा समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कुणबी नोंदी सादर करण्याचे आवाहन
बुलडाणा (जिमाका) दि. 8 : जिल्ह्यातील मराठा समाजास कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी सन 1967 पूर्वीचे कुणबी नोंदी पुरावे संबधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.
कुणबी संदर्भातील निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक, महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्ताऐवज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करून पात्र व्यक्तीना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना दिले आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अथवा कुणबी याबाबतचे सन 1967 पूर्वीचे कुणबी नोंदी पुरावे उपलब्ध असतील अशा विध्यार्थी, नागरिकांनी संबंधीत
दिवाळी उत्सवानिमित्त परिवहन विभागाव्दारे विविध मार्गावर जादा फेऱ्या
बुलढाणा दि. 8 (जिमाका): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभाग बुलडाणा यांचेकडून दिवाळी उत्सवासाठी प्रवाशांना जाणे-येणे करीता विविध मार्गांवर दि. 9 ते 20 नोव्हेंबरपर्यंत जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहे. प्रवाश्यांच्या सोईकरीता ऑनलाईन आरक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. प्रवाश्यांनी https://msrtc.maharshtra.gov.in व www.msrtc.gov.in या संकेतस्थळावरुन किंवा एमएसआरटीस मोबाईल ॲपव्दारे ऑनलाईन बुकींग करावे. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या सुरक्षित व किफायतशीर सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन बुलडाणाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
00000
दिवाळी उत्सवानिमित्त परिवहन विभागाव्दारे पुणे येथून जादा फेऱ्या
बुलढाणा दि. 8 (जिमाका): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभाग बुलडाणा यांचेकडून पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी पुणे येथून बुलडाणा विभागामध्ये प्रवाशांना दिवाळी उत्सवात जाणे-येणे करीता जादा फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे. दि. 11 नोव्हेबरपर्यंत पुणे येथून सुटणाऱ्या जादा फेऱ्यांचे आगाऊ आरक्षण ऑनलाईन रिझर्वेशन सिस्टीमव्दारे PUNECNT या कोडव्दारे करता येणार आहे. ऑनलाईन रिझर्वेशनकरीता प्रवाशांनी www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर किंवा एमएसआरटीस मोबाईल रिझर्वेशन ॲपव्दारे बुकींग करावी.
00000
—
Users Today : 50