Khozmaster
1 Min Read

सत्ता ..

रे झाले भले चांगले
निवडून आला नेता
सर्वत्रचाले जल्लोष
हातात आली सत्ता
ई व्ही एम मशीनवर
आरोप नाही आता
सर्व काही ऑलवेल
नाही कडवट वार्ता
नोटा कुठे वाटल्या
काही कसे म्हणता
नोटाचा तो अतिरेक
केला कुणी जाणता
ख-याचा हा विजय
छान गुणगान गाता
पटले बरोबर आता
चाणाक्ष तो मतदाता
आरोप प्रत्यारोप ना
शांतता मिळे चित्ता
रे अशा निवडणुका
नेहमी घडावी नाथा
वाटते सारे गोड गोड
वा मनाप्रमाणे घडता
उभारू निषेध झेंडा
जरा काही बिघडता

हेमंत मुसरीफ पुणे .
  9730306996
0 9 4 8 7 8
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *