छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील व सावळदबारा परिसरात याविषयी सविस्तर माहिती अशी की, सध्या शेतकरी दिवाळी सणानिमित्त कापूस,सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणत असून बाजारामध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. याचाच गैरफायदा घेऊन व्यापारी त्यांच्या वजन मापामध्ये,व इलेक्ट्रॉनिक काट्यांमध्ये सुद्धा छेडछाड करून त्यातही काळाबाजार करत असल्याची चर्चा शेतकरी करीत आहेत.आणि आपल्या परिसरात घडल्या पण आहे.यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. मार्केटमध्ये कापूस,सोयाबीनची आवक वाढल्यामुळे याचाच गैरफायदा घेऊन मापामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली असून यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनचे वजन करत असतांना पूर्णपणे त्याकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाआप्पा चोपडे यांनी केले आहे.
शेतकरी शेतीमाल पिकवतो परंतु त्याला विक्रि करता येत नाही.म्हणुन शेतकरी आपला शेतीमाल घेऊन जातो व व्यापाऱ्यांच्या स्वाधीन करतो.त्या ठीकानी मालक असलेला शेतकरी चोरासारखा उभा असतो आणि व्यापारी मात्र शेतकऱ्यांचे वस्त्रहरण करतो आणि मनमानी भाव ठरवून शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने लुटता येईल त्या पद्धतीने शेतकऱ्यांची लूट करतो आणि शेतकरी हे सर्व निमूटपणे सहन करतो आहे. याकडे शासनाचे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांचे अजिबात लक्ष नसल्यामुळे शेतकरी मार्केटमध्ये गेल्यानंतर व्यापारी त्याला उघडं नागडं केल्याशिवाय राहत नाही व त्याची फसवणूक होते. याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचेही शिवाआप्पा चोपडे यांनी म्हटले आहे. यावर्षी महाराष्ट्रात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची एकूणच अवस्था बिकट झाली असून शेती उत्पादनावर याचा फार मोठा विपरीत परिणाम झाला आहे .शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन क्विंटल पर्यंत सोयाबीन होत असून यामध्ये शेतकरी संपूर्णपणे उध्वस्त झालेला असतांनाच थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आपला माल व्यापाऱ्यांना विकल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी बाजारामध्ये आणतात. याचाच गैरफायदा घेऊन व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत असल्यामुळे शेतकऱ्यांवर हा दिवसाढवळ्या दरोडा पडत असल्याचे प्रतिपादन
सरपंचपती शिवाआप्पा चोपडे यांनी केले आहे.या काळ्या बाजाराकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी कानाडोळा करीत असून यामागे काय गौडबंगाल आहे हे मात्र कळायला मार्ग नसल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणावर होत आहे.यावर्षी शेतकऱ्यांना निसर्गाने मारलं आणि उरलेसुरले आता व्यापारी लुटत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. याकडे बाजार समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असून शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या मालाचे वजन करत असताना सर्व गोष्टींची शहानिशा करणे फार महत्त्वाचे असुन शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी शेतकऱ्यांनीच घेण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे.मार्केटमध्ये आल्यानंतर सर्वच व्यापारी शेतकऱ्यांचे लचके तोडण्यासाठी टपलेलेच असल्याचे अखिल भारतीय भ्रष्टाचार माजी सभापती शिवाआप्पा चोपडे यांनी म्हटले आहे.
Users Today : 50