राज्यातील सेवा निवृत्त शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा शासनाकडील चौथा व पाचवा थकीत हप्ता दिवाळी साठी द्या

Khozmaster
1 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,०६
राज्यातील शिक्षकांना शासनाने सातव्या वेतन आयोगातील फरकाचे तीन हप्ते दिले,शासकीय सेवेतील सेवा निवृत्त शिक्षकाना व खाजगी शाळेतीलसेवा निवृत्त शिक्षकांना तर चौथा थकीत हप्ता ही मागच्या दोन महिन्यांपूर्वी दिला परंतु राज्यातील जि, प,च्या शाळेतील सेवा निवृत्त शिक्षकांना चौथा हप्ता अद्याप दिलेला नाही ,शासनाला विनंती की राज्यातील सर्व जि, प,सेवा निवृत्त शिक्षकांना त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून शासनाकडे बाकी असलेला चौथा व पाचवा हप्ता ही दिवाळी साठी लगेच प्रदान करावा, दिवाळी बोनस दिवाळी सानुग्रह अनुदान  कार्यरत
कर्मचाऱ्यांना मिळते तसे हे थकीत हप्ते  दिवाळी पूर्वी शासनाने सेवा निवृतांना प्रदान करावे अशी विनंती वैजापूर पेंशनर्स शाखेचे अध्यक्ष धोंडिरामसिंह राजपूत यांनी शासनाला मेल द्वारे पत्र पाठवून केली आहे,राज्यातील सर्व पेन्शनर्स शाखा नी ही मागणी करावी असे आवाहन राजपूत यांनी केले आहे, तरच सेवा निवृतांची दिवाळी गोड या प्रचंड वाढलेल्या महागाई काळात  होईल.
0 9 4 8 7 8
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *