सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर हद्दीत कायद्याचा गैरवापर करून विनाकारण त्रास देणाऱ्या व माहिती न देण्याच्या ऐवजी पैसे मागणाऱ्या पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे फियादी कैलास रघुनाथ सोनवणे वय ४८ रा मधुबन काॅलनी जामनेर ता जामनेर जिल्हा जळगाव यांनी तातडीने फर्दापूर पोलिस ठाणे गाठून फर्दापूर पोलिस ठाण्याचे सपोनि भरत मोरे यांच्या कडे दि.४/११/२३ रोजी खंडणी मागणाऱ्या आरोपीच्या विरोधात पंधरा गायी व एक रुपये खंडणी मागितली अशी तक्रार दाखल करताच तात्काळ दखल घेऊन फर्दापूर पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या आरोपी मनोज इंदलसिंग ठाकूर रा वरखेडी खुर्द ता सोयगाव याला रात्री आठ वाजता नमूद तारीख फिर्यादी हा श्रीनाथ बाबा टष्ट्र राजदेहरे तालुका चाळीसगाव या आश्रमातील गाईची देखभाल करण्यासाठी मौजे गोदरी येथे घेऊन जात असताना यातील आरोपी मनोज ठाकूर यांनी रस्तात गाई अडवून एक लाख रुपये खंडणी मागून १५ गायीची मागणी करुन कैलास सोनवणे फियादीस शिवीगाळ व धक्काबुक्की करत त्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.म्हणून फर्दापूर पोलिस ठाण्यात सीआर नंबर १७०/२०२३ कलम ३४१,३८४,३२३,५०४ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपी खंडणी बहादर मनोज ठाकूर यास अटक केली आहे.आणि पुढील तपास सपोनि भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कुलथे व पो.ना.तडवी करीत आहे.
त्यानुसार पोलिस निरीक्षक भरत मोरे यांच्या आदेशाने गैर अर्जदार आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे .
Users Today : 50