पुणे : पुणे-मुंबईत वाढणारी गर्दी कमी करण्यासह निवास आणि त्यालगतच नोकरी-व्यवसाय अशी पर्यायी जागा उपलब्ध करण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगत नवी स्मार्ट सिटी उभारण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुढाकार घेतला आहे. त्याकरता नागरिकांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने खासगी मालकीच्या जागांवर रुग्णालये, कंपन्या, मॉल, गृहप्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू आहे.
‘स्मार्ट सिटी’चे नियोजन का?
– ‘पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे’जवळ नव्याने रिंग रोड उभारण्यात येत आहे, तर नवी मुंबईत नवीन विमानतळ होत आहे.
– द्रुतगती महामार्ग लवकरच आठ पदरी केला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक वाढणार असून, पुणे-मुंबईतील गर्दी कमी करण्यासाठी या दोन्ही शहरांत ही स्मार्ट सिटी केली जाणार आहे.
– या मार्गादरम्यान स्टेडियम, रुग्णालये, मॉल, कंपन्या, लोकोपयोगी प्रकल्प, कार्यालये; तसेच दळणवळणाचे मार्ग विस्तारत असल्याने त्यांच्या मागणीनुसार, गृहप्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू आहे.
Users Today : 36