जालना : जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव खासगी बस पूलाखाली कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले असून यातील दोघे गंभीर जखमी आहेत.
एमएच ४० सीएम ६९६९ ही पूजा ट्रॅव्हल्सची खासगी बस पुण्याहून नागपूरच्या दिशेने निघाली होती. ही बस छत्रपती संभाजीनगर ते जालना मार्गावरील बदनापूरनजीक मात्रेवाडी शिवारात आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली कोसळली. अपघाताची माहिती मिळतात बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले.जखमींमध्ये अमन कुमार (१९ मध्यप्रदेश), अनिता इंगोले (३५), शहाबज खान, रवींद्र राजे (३३), रितेश चंदेल (२३), पराग शिंगणे (४२ नागपूर), निकेल मानिजे (२३ वर्धा), किरण मांटुळे (३८ यवतमाळ), संभाजी सासणे (३२ यवतमाळ), मधुकर पोहरे (४० अमरावती), गणेश भिसे (३७ यवतमाळ), मोहम्मद सैफुद्दीन (३० ), सागर उपाय्या (१९ मध्य प्रदेश), वर्षा नागरवाडे (४०यवतमाळ), शुभम हत्तीमारे (२७ गोंदिया) या १५ जखमींवर जालना येथील शासकीय रूग्णालयात उपचार केले जात आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयातील डॉ. उमेश जाधव, डॉ. अनुराधा जाधव व त्यांच्या टीमने उपचार सुरू केले.
Users Today : 32