अकोला प्रती – आलेगाव येथील स्व. शेषरावजी देशमुख (गुरुजी) यांच्या पुण्यस्मरणा निमित्त स्व शेषरावजी देशमुख सेवा फाउंडेशन च्या वतीने देशसेवा करणारे सैनिक व रुग्णसेवा करणारे रुग्णसेवक यांचा सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमात सामाजिक तसेच रुग्णसेवा सदैव तत्पर असणारे सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांचा कार्यक्रमाचे आयोजक रक्षण देशमुख यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सोबतच सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांच्या जाहीर प्रबोधनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी सत्यपाल महाराजांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमात सैनिक सुधाकर गि-हे,गोपाल इंगळे, प्रमोद उगले, ज्ञानेश्वर राखोंडे, गोरखनाथ सातपुते, मंगेश महल्ले, रामेश्वर गिरे, राष्ट्रपाल तेलगोटे, मंगेश वानखडे, अमोल वानखडे, नितीन तेलगोटे, पुरुषोत्तम लहामगे, गोपाल देशमुख तर रुग्णसेवक मंगेश केनेकर, नवनाथ ऐकड, शिवकुमार बायस, विजय वानखडे, बाळ काळणे, दीपक सदाफळे, सचिन बारोकर, डॉ. मुजाहीद, शेरूभाई मिश्रा, दुलेखान युसूफ खान आदी व आलेगांवातील गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
Users Today : 28