सावळदबारा परिसरात वसुबारस : दिवाळी सणाला झाली सुरुवात

Khozmaster
2 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात यंदा दिवाळीची सर्वत्र तयारी पूर्ण झाली आहे. वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात होते. यावर्षी देखील ही परंपरा ग्रामीण भागात शुद्धा कायम असून आज वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. वसुबारसपासून घरोघरी दिवे लावून दिवाळीला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.
वर्षातील महत्वपूर्ण सण- उत्सवापैकी असलेला सण म्हणजे दिवाळी सण. सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण दिवाळी सणाचा उत्साह सर्वत्र यंदाही जास्त ग्रामीण भागात कायम आहे. घरोघरी पारंपरिक पद्धतीने दिवाळी सणाला आजपासून सुरुवात झाली आहे. घरोघरी दीपोत्सवास सुरुवात होणार आहे. वसुबारस पासून दिवाळी सणाला यंदाही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. घरोघरी आकाशकंदील, दिवे लावून दीपोत्सव आणि दिवाळीला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने घरोघरी जोरदार तयारी देखील पूर्ण झाली आहे. सर्वत्र चैतन्यमय वातावरण असून देवळगाव गुजरी, फत्तेपूर व सावळदबारा बाजारात देखील खरेदीसाठी लगबग सुरू आहे. वसुबारस निमित्ताने दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. अशी माहिती अतुल इंगळे ग्रामपंचायत सदस्य मोलखेडा यांनी दिली.
0 9 4 8 5 6
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *