शेतकरी संघटनांच्या मागणीनुसार उसाला एका टनाला पाच हजार रुपये दर द्यावा, महादेव जानकर यांची मागणी

Khozmaster
2 Min Read

सातारा : मुख्यमंत्र्यांनी या वर्षी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. सध्या शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागणीनुसार उसाला पाच हजार दर द्यावा, दुधाला एका लीटरला शंभर रुपये दर मिळावा, शेतकऱ्यांना टोल माफी करावी, अशी मागणी माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे आज कराडमध्ये ऊसदर, दूध दराबाबत बळीराजा शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. या वेळी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट देऊन त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर कराड ते पाटण संयुक्त ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांना वंदन करून आम्ही मोर्चा सुरू केला आहे. कराड ते पाटण संयुक्त ट्रॅक्टर रॅली काढली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी सर्वसामान्य माणसांना राजकारणाची दारे खुली केली. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे काम केले. तसेच शेतकरी हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरविण्याचे काम सातारा जिल्हा करत आहे. तसेच शेतकऱ्यांला वीज, रस्ता देण्याचे काम त्यांनी केले, असं जानकर म्हणाले.एका दाण्याचे हजार दाणे करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये असून, जगाच्या पोशिंद्याला आज राजकारण्यांपुढे भीक मागावी लागत आहेधनगर आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी ही सरकारकडून अपेक्षा असल्याचं जानकर यांनी सांगितले.शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सरकारने त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. शेतकरी व कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी प्रीतिसंगमावरून व्यक्त केली.दरम्यान, राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु झाला आहे. काही साखर कारखान्यांनी दर जाहीर केला असला तरी बहुतांश साखर कारखान्यांनी दर जाहीर न करताच गाळप हंगाम सुरु केला आहे. उसाच्या दरासाठी सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. त्यामुळं या भागातील शेतकऱ्यांना उसाला समाधानकारक दर मिळाला आहे.
0 9 4 8 5 3
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *