अकोला : अकोला जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात गेले आहे. काल मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांच्या मार्गदर्शनात हा प्रवेश झाला आहे.माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक बादलसिंग ठाकूर, माजी उपजिल्हाप्रमुख तसेच माजी नगरसेवक गजानन पावसाळे, माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक संतोष आणासने, हिंगणा वाडेगाव माजी सरपंच भिकाजी पाटिल, कुणाल पिंजरकर, ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख पप्पू चौधरी, विभाग प्रमुख कौलेखड संदीप पत्की, सुनील इंगळे यांचा प्रवेश झाला. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यावेळी उपस्थित होते.
श्रीरंग पिंजरकरांनी म्हटलं आहे की ठाकरे गटात आमची दखल घेतली जात नव्हती. शेवटी जनतेच्या कामासाठी आम्हाला शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश घेण्याची वेळ आली आहे, आता या पक्षाला जिल्हा, विभागात अधिक बळकट करण्यावर आपला भर राहील, असेही ते म्हणाले.श्रीरंग पिंजरकर यांची राजकीय कारकीर्द-
स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी १९९७ मध्ये वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी श्रीरंग पिंजरकर यांना दिली होती. सण २००० मध्ये अकोला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले, पुढे नगरसेवक पदी निवडून आले आणि थेट अकोला महानगरपालिकेचे उपमहापौर झाले. २००४ मध्ये बोरगावमंजू (आताचा अकोला पूर्व) मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहिले. परंतु याच मतदारसंघातून पक्षातीलच विजय मालोकार यांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांचा प्रचंड मतांनी पराभव झाला. तेव्हा मालोकार हे अपक्ष उमेदवार म्हणून त्यांना ४० हजारांवर मते मिळाली होते. २००७ मध्ये पुन्हा पिंजरकर हे शिवसेना अकोला जिल्हा प्रमुख पदी नियुक्त झाले. अशाप्रकारे पिंजरकरांनी जिल्हाप्रमुख पदाची पंधरा वर्षाहुन अधिक धुरा संभाळली.
Users Today : 15