अकोला प्रती – प्रभाग क्रमांक १८ मध्ये स्वच्छतेचा अभाव, वाढलेली झाडेझुडपे, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची नसलेली सफाई, रस्त्यांची होत नसलेली झाडपूस नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात ताप तसेच डेंग्यूची साथ सुरू आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असतांना महानगरपालिका च्या स्वच्छता विभागाकडून नालेसफाईचे काम प्रभाग क्रमांक १८ मध्ये थातुर मातुर पध्दतीने सुरू असून नाल्यातील कचरा हा नागरीकांच्या घरासमोरच रस्त्यावर फेकण्यात येत आहे. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून या घाण कचऱ्यामुळे स्थानिक नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करून ही प्रभाग क्रमांक १८ मधिल नालेसफाई व्यवस्थित होत नसुन महानगरपालिका आयुक्त दुर्लक्ष करत आहेत.म्हणुन जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रभाग क्रमांक १८ मधिल नागरीकांडुन होत आहे.
Users Today : 14