भाऊराया ..

Khozmaster
1 Min Read
सुख जळे दुष्काळे
काहीन उरलं घरांत
कशीबशी भरून ये
जखम  ती अंतरात
कशी करू थाटमाट
भाऊबीजेचे सणात
रक्ताळला सातबारा
बुडाले पार  ऋणात
संसाराची करीते मी
अ  पासूनि  सुरवात
तेल तूप न निरांजन
डोळ्यांची  फुलवात
गोड धोड नाही केले
गोडवा फक्त मुखात
ईश्वरा मागणे मागते
रहावा भाऊ सुखात
आमची झाली तशी
न हो कुठे वाताहात
ठेवते डोईवर तुझ्या
फक्त  आशीष  हात
परिस्थिती येते जाते
भरडे जरी  जात्यात
भरभरुन प्रेम वर्षाव
भिजा  चिंब नात्यात

लढायचा  मंत्र कसा
सांगते तुझ्याकानात
भौक्तीत  सुखे  नश्वर
दिवाळी हवी  मनात
— हेमंत मुसरीफ पुणे
   ९७३०३०६९९६
0 9 4 8 4 2
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *