एजाज खानपंडित जवाहरलाल नेहरू आधुनिक भारताचे शिल्पकार…. श्यामभाऊ उमाळकर

Khozmaster
2 Min Read
मेहकर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वर्गीय भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचा कार्यक्रम मेहकर विधानसभा जनसंपर्क कार्यालय येथे जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस  कमिटीचे सरचिटणीस शामभाऊ उमाळकर हे होते. तर बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस कलीम भाई खान, मेहकर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज हजारी, भीमशक्तीचे कैलास सुखधाने साहेब, राजेश भाऊ अंभोरे इत्यादी मान्यवरांनी  आपले मनोगत व्यक्त केले.  शामभाऊ उमाळकर म्हणाले पंडित जवाहरलाल नेहरू हे विद्यार्थी दशेत असतानाच स्वतंत्र चळवळीमध्ये भाग घेतला परकीय व जुलमी राजवटीखालील देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांना रुची होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकूण नऊ वेळा तुरुंगवास त्यांना भोगावा लागला व देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते देशाचे पहिले पंतप्रधान झाले. एका कार्यक्रमात गेले असताना एका महिलेने त्यांना प्रश्न विचारला या स्वातंत्र्याने सर्व काही तुम्हालाच मिळाले आम्हाला काहीच मिळाले नाही तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले तुम्हाला या देशाच्या पंतप्रधाननाची कॉलर पकडण्याचा अधिकार मिळाला. पंडित जवाहरलाल नेहरू आपला देश सोडून गेल्यानंतर आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट असताना   तेव्हा आपल्या देशामध्ये  पंतप्रधान  झाले तेव्हा  कोणताही प्रकारचा विकास झालेला नव्हता प्रचंड गरिबी
पंडित जवाहरलाल नेहरूंनी  आपली संपत्ती देशाला दान म्हणून दिली व आधुनिक भारत घडवण्याचे  काम केले म्हणून  आधुनिक भारताचा शिल्पकार म्हटल्या जाते. असे गौरव उद्गार शामभाऊ उमाळकर यांनी काढले.
 यावेळी माजी नगरसेवक रवी भाऊ सावजी, युवा नेते वैभव उमाळकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रियाज भाई कुरेशी, छोटूभाई गवळी, नारायण भाऊ इंगळे, आशुतोष तेलंग, आकाश अवसरमोल, मुन्नाभाई खान, सुखदेव ढाकरके, जमील भाई अहमद, तारीख भाई खान, नईम भाई, नावेद खान, सलीम टेलर, प्रदीप गवई इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. तर  आभार छोटूभाई गवळी यांनी मानले
0 9 4 8 4 2
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *