तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
दे. राजा ( १४ नोव्हेंबर)
दि. १२ नोव्हेंबर, २०२३ रोजी श्री बालाजी संस्थान कार्यालयात मुहूर्ताप्रमाणे सायंकाळी ७:३० वाजता लक्ष्मीपूजन करण्यात आले. वंशपारंपारिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव व पूजेचे मानकरी श्री. टाकळकर यांच्या हस्ते श्री बालाजी महाराजांच्या सर्व ऐतिहासिक दागिन्यांचे विधिवत पूजन होऊन आरती झाली.
दिनांक १४ नोव्हेंबर, २०२३ रोजी मुहुर्ताप्रमाणे सकाळी ९:०० वाजता संस्थान कार्यालयात सरस्वती पूजन झाले. वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, श्री. टाकळकर व व्यवस्थापक श्री. बीडकर यांच्या हस्ते संस्थानचे खाते बुक व पंचांगाचे विधीवत पूजन होऊन आरती झाली. त्यानंतर ब्रम्हवृंदांनी पंचांग वाचन केले.
दोन्ही कार्यक्रमास सर्व क्षेत्रउपाध्ये, सर्व देवउपाध्ये, त्रैशाखीय ब्राह्मणवृंद तसेच कर्मचारी उपस्थित होते.
Users Today : 12