छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,१५
भाऊबीज हा दिवाळीतील सण भावा-बहिणीच्या अतूट नात्याची आठवण करून देणारा सण आहे याचे
भान ठेवत व सामाजिक बांधिलकी जपत वैजापूर येथील शिंदे गट शिवसेनेच्या वतीने मंगळवार (ता,१४)रोजी देवी मंदिर परिसरात राहणाऱ्या दीडशे आदिवासी महिलांना भाऊबीज निमित्त साडी,चोळी व मिठाई वाटप वैजापूर-गंगापूर चे कर्तव्य दक्ष आमदार प्रा,रमेश पा,बोरनारे यांच्या हस्ते करण्यात आला,वैजापूर तालुका शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख राजेंद्र पा,साळुंके, शहर प्रमुख पारस घाटे यांनी आयोजित या कार्यक्रमात उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रशांत त्रिभुवन,स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत,माजी नगरसेवक सखाहरी बर्डे,ज्ञानेश्वर टेके माऊली,बबनराव त्रिभुवन,वसंत त्रिभुवन,रामकीसन जोरे, शंकर मुळे, श्रीकांत साळुंके,वल्लभ सोनवणे, बळीराम राजपूत,सुरेंद्र सुतवणे,यांच्या हस्ते ही भाऊबीज किट वाटप करण्यात आले, आ,बोरनारे वआयोजक शिवसेना शहर प्रमुख पारस घाटे यांनी सर्व आदिवासी भगिनींना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या व सर्वांना निरोगी जीवन जगण्याचा सल्ला दिला,तसेच आभार मानले, या प्रसंगी शहरातील बरीच नागरिक मंडळी उपस्थित होती
(फोटो कॅप्शन
आदिवासी महिलांना भाऊबीज भेट साडीचोळी व दिवाळी मिठाई प्रदान करताना आ,बोरनारे,पारस घाटे,राजेंद्र साळुंके,धोंडीराम राजपूत व ईतर)
Users Today : 12